Pakistan Cricket Team Captain: पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. शाहीन शाह आफ्रिदी याला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले आहे. पीसीबीने आज वनडे आणि टी 20 क्रिकेटचं कर्णधारपद पुन्हा एकदा बाबर आझम याच्याकडे सोपवलं आहे. गेल्या दिवसांपासून पाकिस्तानच्या संघात कर्णधारपदावरून बराच गदारोळ झाला होता. यामध्ये आज आणखी भर पडली. जावई शाहीन शाह आफ्रिदी याचं कर्णधारपद काढून घेतल्यानंतर शाहीन आफ्रिदी संतापला. त्यानं सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला. त्यानं एक्स (ट्वीटर) वर पोस्ट करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला खडे बोल सुनावले आहेत.


 2023 वनडे विश्वचषकात पाकिस्तान संघानं खराब कामगिरी केली होती. खराब प्रदर्शनानंतर बाबर आझम यानं तिन्ही संघाच्या कर्णधारपदाला रामराम केला होता. त्यानंतर टी 20 संघाची धुरा शाहीन शाह आफ्रिदी याच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. पण आता बाबर आझम याला पुन्हा एकदा मर्यादीत फॉर्मेटच्या संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. पीसीबीचा हा निर्णय शाहीद आफ्रिदीला रुचला नाही. आफ्रिदीने सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला. 


शाहीद आफ्रिदी काय म्हणाला ?


पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीन आफ्रिदीने X वर आपला राग व्यक्त केला आहे. आफ्रिदीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "निवड समितीमध्ये अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे, त्यामुळे हा निर्णय आश्चर्यचकीत करणारा आहे. जर संघात काही बदल करायचा होता, तर मोहम्मद रिझवान हा कर्णधारपदाचा चांगला पर्याय होता. पण आता निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तान संघ आणि बाबर आझम यांना माझ्याकडून शुभेच्छा!"






दरम्यान, कर्णधार बदलल्यानंतरही संघाच्या कामगिरीत फरक पडला नाही. त्यामुळे 2024 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी पीसीबीने पुन्हा कर्णधार बदलून बाबरकडे जबाबदारी सोपवली. शाहीन शाह आफ्रिदी याला कर्णधारपदावरुन काढल्यानंतर त्यानं कोणताही विरोध दर्शवला नाही. पण फक्त एकाच मालिकेनंतर त्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. हे पाकिस्तानच्या चाहत्यांना रुचलं नाही. 



अवघ्या पाच सामन्यानंतर शाहीन आफ्रिदीची उचलबांगडी - 
 
2023 एकदिवसीय विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर बाबर आझम यानं कर्णधारपद सोडलं. त्याच्या जागी शाहीन शाह आफ्रिदीला पाकिस्तानच्या संघाची धुरा सोपवण्यात आली. आगामी टी-20 विश्वचषकात शाहीन आफ्रिदी पाकिस्तानी संघाचे नेतृत्व करेल, असे मानले जात होते. मात्र अवघ्या 5 सामन्यांनंतर शाहीन आफ्रिदीला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. त्यामुळे आता टी-20 विश्वचषकात शाहीन आफ्रिदीच्या जागी बाबर आझम कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे. सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे की, शाहीन आफ्रिदीसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे, केवळ 5 सामन्यांनंतर पीसीबीने कर्णधारपद काढून घेतले.