CSK Qualification Scenario : चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) चेपॉक स्टेडियमवर बुधवारी पंजाब किंग्सकडून (PBKS vs CSK) दारुण पराभवाचा सामना करावा लागला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नईचं प्लेऑफचं गणित बिघडलं आहे. चेन्नईचे आता दहा सामन्यात दहा गुण झाले आहेत. चेन्नई सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असून प्लेऑफचा दावेदार म्हटलं जात आहे. पण प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी चेन्नईला कंबर कसावी लागणार आहे. कारण, महत्वाचे गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्यामुळे अडचणी वाढलेल्या आहेत. 


चेन्नई सुपर किंग्सचं प्लेऑफचं नेमकं समीकरण कसं असेल ?


आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचे आता चार सामने शिल्लक आहेत. चेन्नईच्या नावावर 10 गुण असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी 16 गुण गरजेचे आहेत. त्यासाठी चेन्नईला उर्वरित चार सामन्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवावा लागेल. 16 गुणांसह चेन्नईचा संघ आरामात प्लेऑफसाठी पात्र होईल. चेन्नईचे पुढील सामने तळाच्या संघासोबत आहेत, त्यामुळे आव्हान जास्त कठीण असेल. कारण, तळाचे संघही प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी प्रत्येक सामन्यात विजय मिळवायच्या इराद्यानेच मैदानात उतरतील.  चार सामन्यातील चेन्नईचा एकच सामना घरच्या मैदानावर आहे. 


चेन्नईचे सामने कुणासोबत कधी अन् कुठे ?


5 मे - धर्मशाला - पंजाब किंग्स


10 मे - नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद - गुजरात टायटन्स


12 मे - चेपॉक स्टेडियम - राजस्थान रॉयल्स


18 मे - चिन्नस्वामी स्टेडियम - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु






राजस्थानचा संघ गणतालिकेत अव्वल - 


राजस्थानचा संघ अजून गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. राजस्थानने 9 सामन्यात 8 विजय मिळवले आहे. राजस्थानचे सध्या 16 गुण आहेत. कोलकाताचा संघ 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर लखनौता संघ 12 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नईचा संघ सध्या चौथ्या स्थानावर आहे. चेन्नईचे सध्या 10 गुण आहेत. हैदराबादचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. हैदराबादने एकूण 9 सामन्यात 5 विजय मिळवले आहेत. तर 4 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादचे सध्या 10 गुण आहेत. दिल्लीचा संघ सहाव्या स्थानावर आहे. दिल्लीचे 10 गुण आहेत. तर पंजाबचा संघ 8 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. गुजरातचा संघ 8 गुणांसह आठव्या क्रमांकावर, मुंबईचा संघ नवव्या, तर बंगळुरुचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे. बंगळुरुचे 6 गुण आहेत.