RR vs RCB IPL 2024 :विराटच्या शतकाला बटलरच्या शतकानं उत्तर, आरसीबीला पराभवाचा धक्का, राजस्थान टॉपवर

IPL 2024 RR vs RCB live score updates : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये आज आमनासामना होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर ही लढत होणार आहे.

नामदेव कुंभार Last Updated: 06 Apr 2024 11:13 PM
राजस्थानचा सलग चौथा विजय

विराटच्या शतकाला बटलरनं शतकानं उत्तर दिलं आहे.राजस्थान रॉयल्सकडून बटलरनं 100 धावा केल्या. यामुळं आरसीबीला पराभवाचा धक्का बसला. राजस्थान गुणतालिकेत आता पहिल्या स्थानावर पोहोचलं आहे.  

राजस्थान रॉयल्सला दुसरा धक्का, संजू सॅमसन 69 धावांवर बाद

राजस्थान रॉयल्सला दुसरा धक्का बसला असून संजू सॅमसन 69 धावांवर बाद झाला आहे.  

संजू सॅमसनचं अर्धशतक , आरसीबी बॅकफूटवर

संजू सॅमसननं अर्धशतक केलं असून यामुळं आरसीबी बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे.  

जोस बटलरचं अर्धशतक

जोस बटलरचं अर्धशतक





राजस्थाननं गियर बदलला, 7 ओव्हरमध्ये एका विकेटवर 63 धावा

राजस्थाननं गियर बदलला असून 7 ओव्हरमध्ये एका विकेटवर 63 धावा केल्या आहेत. 

विराट कोहलीचं शतक, राजस्थानसमोर विजयासाठी किती धावांचं आव्हान

विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर आरसीबीनं 20 ओव्हर्समध्ये 3 बाद 183 धावा केल्या आहेत. राजस्थानला 184 धावा विजयासाठी कराव्या लागतील. 

विराट कोहलीची दमदार खेळी, यंदाच्या आयपीएलमध्ये पहिलं शतक

विराट कोहलीनं यंदाच्या आयपीएलमधील पहिलं शतक झळकवलं आहे. विराट कोहलीनं शतकी खेळीच्या जोरावर राजस्थानला बॅकफूटवर ढकललं. विराट कोहलीनं 4 सिक्स  आणि 9 चौकारांच्या जोरावर ही धावसंख्या उभारली. 

आरसीबीला दुसरा धक्का, मॅक्सवेल पुन्हा स्वस्तात बाद

आरसीबीला दुसरा धक्का बसला असून मॅक्सवेल पुन्हा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. मॅक्सवेल 1 रन करुन बाद झाला. 

डुप्लेसिस आणि विराटची फटकेबाजी , राजस्थान बॅकफूटवर

विराट कोहलीच्या 71 धावा आणि मॅक्सवेलच्या 42 धावांच्या जोरावर आरसीबीनं 13 ओव्हरमध्ये बिनबाद 122 धावा केल्या. 

आरसीबीच्या 100 धावा, राजस्थानला विकेटची प्रतीक्षा

विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसच्या भागिदारीच्या जोरावर बंगळुरुनं 12 व्या ओव्हरमध्ये 100 धावांचा टप्पा पार केला आहे.

विराट कोहलीचं अर्धशतक

विराट कोहलीनं यंदाच्या आयपीएलमधील तिसरं अर्धशतक केलं आहे. आरसीबीच्या 11 ओव्हरअखेर 98 धावा झाल्या आहेत. 

आरसीबी आणि राजस्थानमध्ये काटें की टक्कर

आरसीबी आणि राजस्थानमध्ये काटें की टक्कर असल्याचं चित्र पहिल्या सहा ओव्हरमध्ये पाहायला मिळालं.  आरसीबीनं पहिल्या सहा ओव्हरमध्ये बिनबाद 53 धावा केल्या. 

विराट कोहलीची आक्रमक सुरुवात, आरसीबीच्या 4 ओव्हरमध्ये 42 धावा

विराट कोहलीनं डावाची सुरुवात आक्रमक केली आहे. आरसीबीच्या 4 ओव्हरमध्ये 42 धावा झाल्या आहेत.

RCB vs RR : विराट कोहलीचे दोन चौकार, आरसीबीच्या 21 धावा

दुसऱ्या ओव्हरमध्ये आरसीबीनं धावा करण्याचा वेग वाढवला असून दोन ओव्हरनंतर आरसीबीनं बिनबाद 21 धावा केल्या आहेत. यामध्ये विराट कोहलीनं दोन चौकार मारले आहेत.

RCB vs RR : आरसीबीची सावध सुरुवात, पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा

RCB vs RR : आरसीबीची सावध सुरुवात केली असून पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा केल्या आहेत. 

राजस्थान आणि बंगळुरु यांच्यात थोड्याच वेळात टॉस होणार

राजस्थान आणि बंगळुरु यांच्यात थोड्याच वेळात टॉस होणार आहे. संजू सॅमसन आणि फाफ डु प्लेसिस यांच्यापैकी कोण टॉस जिंकणार हे पाहावं लागणार आहे. 

RR vs RCB : राजस्थान रॉयल्सला सलामीवीरांच्या फॉर्मची चिंता

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल चांगली खेळी करु शकलेला नाही. यशस्वी जयस्वालनं तीन मॅचमध्ये 39 धावा केल्या आहेत. जोस बटलर देखील तीन मॅचमध्ये 35 धावा करु शकला आहे. 

विराट कोहली आणखी एका विक्रमाजवळ 

विराट कोहलीनं आजच्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध 62 धावा केल्यास त्याच्या नावावर 8 हजार धावांची नोंद होईल. एखाद्या फ्रँचायजीसाठी 8 हजार धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरेल.

RR vs RCB : आरसीबी गुणतालिकेत कितव्या स्थानी?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. आयपीएलमध्ये सध्या आरसीबी गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. 

चहल पर्पल कॅपपासून दोन पावले दूर

पर्पल कॅपच्या स्पर्धेत गुजरातचा मोहित शर्मा आघाडीवर आहे. मोहित शर्माने आतापर्यंत 4 सामन्यात 18.71 च्या सरासरीने सात विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनमीही फक्त 8.18 इतका कमी आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर चेन्नईचा मुस्तफिजुर रहमान आहे. मुस्तफिजुरने तीन सामन्यात 15.14 च्या सरासरीने 7 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या इकॉनमी 8.38 इतका आहे. 


पर्पल कॅपच्या स्पर्धेमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव याचाही कर्मांक लागतो. मयंकने दोन सामन्यात 6.82 च्या शानदार सरासरीने सहा विकेट घेतल्या आहेत, तो तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. चौथ्या क्रमांकावर राजस्थानचा युजवेंद्र चहल आहे. युजवेंद्र चहलने 9.16 च्या सरासरीने 6 विकेट घेतल्या आहेत. आज चहल आरसीबीविरोधात मैदानात उतरणार आहे. दोन विकेट घेताच चहल पर्पल कॅपवर कब्जा करेल. पर्पल कॅपच्या स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर दिल्लीचा खलील अहमद आहे, त्याने 21.83 च्या सरासरीने 6 विकेट घेतल्या आहेत. 

सामन्याआधी आरसीबीच्या खेळाडूंचा कसून सराव

अभिषेक शर्माच्या टप्प्यात ऑरेंज कॅप - 

रनमशीन विराट कोहलीकडे सध्या ऑरेंज कॅप आहे. आतापर्यंत विराट कोहलीने सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. कोहलीने 4 सामन्यात 203 धावा चोपल्या आहेत. पण अभिषेक शर्माकडून विराट कोहलीला तगडी टक्कर दिली जातेय. अभिषेक शर्माच्या नावावर 161 धावा आहेत. तो पाचव्या क्रमांकावर पोहचलाय. ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत राजस्थानचा रियान पराग दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याच्या नावावर तीन सामन्यात 181 धावा आहेत. आज विराट कोहली आणि रियान पराग आमनेसामने असतील. ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर हैदराबादचा हेनरिक क्लासेन आहे. क्लासेन याने 4 सामन्यात 177 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या शुभमन गिल याने 4 सामन्यात 164 धावा जमवल्या आहेत. 

रॉयल लढतीआधी संजू सॅमसन काय म्हणाला ?

चहलकडे पर्पल कॅप पटकावण्याची संधी

पर्पल कॅपच्या स्पर्धेत गुजरातचा मोहित शर्मा आघाडीवर आहे. मोहित शर्माने आतापर्यंत 4 सामन्यात 18.71 च्या सरासरीने सात विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनमीही फक्त 8.18 इतका कमी आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर चेन्नईचा मुस्तफिजुर रहमान आहे. मुस्तफिजुरने तीन सामन्यात 15.14 च्या सरासरीने 7 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या इकॉनमी 8.38 इतका आहे. 


पर्पल कॅपच्या स्पर्धेमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव याचाही कर्मांक लागतो. मयंकने दोन सामन्यात 6.82 च्या शानदार सरासरीने सहा विकेट घेतल्या आहेत, तो तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. चौथ्या क्रमांकावर राजस्थानचा युजवेंद्र चहल आहे. युजवेंद्र चहलने 9.16 च्या सरासरीने 6 विकेट घेतल्या आहेत. आज चहल आरसीबीविरोधात मैदानात उतरणार आहे. दोन विकेट घेताच चहल पर्पल कॅपवर कब्जा करेल. पर्पल कॅपच्या स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर दिल्लीचा खलील अहमद आहे, त्याने 21.83 च्या सरासरीने 6 विकेट घेतल्या आहेत. 

विराट कोहली-चाहलची भेट, पाहा व्हिडीओ

Royal Challengers Bengaluru : सलामीला पाठवणार का? सिराजचा कोचला सवाल



आरसीबीमध्ये कोण कोणते खेळाडू ?

 विराट कोहली, फाफ डुप्लेसी (कर्णधार), कॅमरन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), रीस टॉप्ली, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल, आकाशदीप, मनोज भंडागे, सौरव चौहान, टॉम करन, लॉकी फर्ग्यूसन, विल जैक्स, अल्जारी जोसेफ, महिपाल लोमरोर, सुयश प्रभुदेसाई, राजन कुमार, हिमांशु शर्मा, कर्ण शर्मा, स्वप्निल सिंह, विजयकुमार वैशाख.

राजस्थानच्या ताफ्यात कोण कोण ?

यशस्वी जायसवाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, आर अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युजवेंद्र चहल, तनुष कोटियान, आबिद मुश्ताक, शुभम दुबे, डेनोवन फरेरा, टॉम कोहलर कॅडमोर, रोवमन पॉवेल, कुणाल सिंह राठौर, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन.

RR vs RCB Pitch Report: जयपूर सवाई मानसिंह स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल ?

RR vs RCB IPL 2024 : जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियमच्या (Sawai Man Singh Stadium Jaipur) खेळपट्टीवर फलंदाजांचा बोलबाला राहतो. विशेष म्हणजे, अचूक टप्प्यावर मारा केल्यास खेळपट्टी गोलंदाजांनाही मदत करते. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतो. स्टेडियम मोठं असल्यामुळे चौकार-षटकार लगावण्यासाठी फलंदाजांना मेहनत घ्यावी लागते.  

RR vs RCB IPL 2024 : हेड टू हेड आकडे काय सांगतात? वरचढ कोण ?

RR vs RCB IPL 2024 : 


हेड टू हेड आकडे पाहिल्यास आरसीबीचे पारडे जड दिसत आहे. रासजस्थान आणि आरसीबी यांच्यामध्ये आतापर्यंत 30 वेळा लढत झाली आहे.  ज्यामध्ये आरसीबीने 15 सामने जिंकले आहेत तर राजस्थान संघाने 12 वेळा विजय मिळवला आहे.  धावांचा पाठलाग करताना आरसीबीने 10 तर राजस्थानने 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर प्रथम फलंदाजी करताना दोन्ही संघाने प्रत्येकी पाच पाच सामन्यात विजय मिळवला आहे. तीन सामन्यात कोणताही निकाल लागला नाही.

RR vs RCB IPL 2024 : राजस्थान रॉयल्स संभाव्य प्लेईंग 11

RR vs RCB IPL 2024 : यशस्वी जयसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान/संदीप शर्मा, नंद्रे बर्गर, युजवेंद्र चहल 

RR vs RCB IPL 2024 : आरसीबी संभाव्य प्लेईंग 11

 RR vs RCB IPL 2024 : विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स/कॅमरुन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), कर्ण शर्मा, रीस टॉपले, मोहम्मद सिराज, यश दयाल

पार्श्वभूमी

IPL 2024 RR vs RCB live score updates : जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर आज रॉयल (RR vs RCB) लढत होणार आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals ) आणि फाफच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore)  यांच्यामध्ये आज काटें की टक्कर होईल. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.