RR Vs MI, IPL 2022 Live Update : गुजरातनं सामना जिंकला! बंगळुरूचा सहा विकेट्सनं पराभव, विराटचं अर्धशतक व्यर्थ
RR Vs MI, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 43 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे.
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Apr 2022 07:29 PM
पार्श्वभूमी
RR Vs MI, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 43 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. या हंगामात दोन्ही संघानं चांगली कामगिरी करून...More
RR Vs MI, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 43 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. या हंगामात दोन्ही संघानं चांगली कामगिरी करून दाखवली आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरातचा संघ अव्वल स्थानी आहे. तर, बंगळुरूचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. गुजरातनं आठ पैकी सात सामने जिंकले आहेत. तर, एक सामना गमावला आहे. दुसरीकडं बंगळुरूच्या संघाला नऊ पैकी सहा सामन्यात विजय मिळवता आला आहे. फॅफ डू प्लेसिस नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुसमोर शनिवारी ‘आयपीएल’मध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्सचं आव्हान असणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणारा हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्याचे गुजरातचे लक्ष्य असेल.कधी, कुठे पाहणार सामनागुजरात टायटन्स आणि आरसीबी यांच्यातील सामना मुंबईतील ब्रेबॉन स्टेडिअममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 3. 30 वाजता सुरू होईल. दुपारी 3 वाजता नाणेपेक होईल.वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. राजस्थानचा संभाव्य संघ-यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिकल, संजू सॅमसन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, नॅथन कुल्टर-नाईल, प्रशांत कृष्णा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहलमुंबईचा संभाव्य संघ-इशान किशन (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंग, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.हे देखील वाचा-RR Vs MI: मुंबईसाठी डोकेदुखी ठरलाय राजस्थानचा 'हा' फलंदाज, पलटणविरुद्ध 6 डावात ठोकल्यात 400 धावाShubman Gill : शुभमन गिलची एलॉन मस्ककडे स्विगी विकत घेण्याची विनंती, जाणून घ्या काय आहे कारण?RR vs MI, IPL 2022 : पहिल्या विजयासाठी मुंबईला 'रॉयल' आव्हान, कोण मारणार बाजी?
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
गुजरातनं सामना जिंकला! बंगळुरूचा सहा विकेट्सनं पराभव, विराटचं अर्धशतक व्यर्थ
GT Vs RCB: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या 43 व्या सामन्यात गुजरात टायटन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 6 विकेट्सनं पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून बंगळुरूच्या प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बंगळुरूच्या संघानं 20 षटकात 6 विकेटस् गमावून धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातच्या संघानं 6 विकेट्स राखून हा सामना जिंकला. गुजरातच्या विजयात अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलरनं महत्वाची भूमिका बजावली