KKR vs GT : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 35 वा सामना आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स (KKR vs GT) हे दोन्ही संघ मैदानात उतरले असून गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे. शक्यतो  नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी घेत असल्याचं दिसून आलं आहे. पण गुजरातने काहीसा वेगळा निर्णय़ घेतला आहे. सामना दुपारी असल्याने दुसऱ्या इनिंगमध्येही दवाची अडचण होणार नसल्याने हा निर्णय गुजरातने घेतला असावा.



दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता कोलकाता संघाने टीममध्ये तीन बदल केले आहेत. यावेळी विकेटकीपर म्हणून शेल्डॉन जॅक्सनच्या जागी सॅम बिलिंग्ज आत आला आहे. तर पॅट कमिन्सच्या जागी टीम साऊदी आणि आरॉन फिंचच्या जागी रिंकू सिंगला संधी दिली आहे. तर गुजरातचा कर्णधार हार्दिक फिट असून आज संघात परतल्यामुळे विजय शंकराला विश्रांती देण्यात आली आहे. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...


कोलकाता अंतिम 11


वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), रिंकू सिंग, सुनील नारायण, टीम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती


गुजरात अंतिम 11  


रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, यश दयाल, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी. 


 


हे देखील वाचा-