Rohit Sharma Viral Video मुंबई : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) गेल्या आयपीएलच्या(IPL 2024) गेल्या तीन पर्वातील अपयश विसरुन सहावं विजेतेपद पटकावण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे. शुक्रवारी म्हणजेच उद्या आयपीएलचं 17 पर्व सुरु होत आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पहिला सामना होणार आहे. मुंबई इंडियन्सचं अभियानं यावेळी 24 मार्चला गुजरात टायटन्स यांच्या विरुद्धच्या मॅचनं होणार आहे. ही मॅच गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. मुंबईच्या टीमची आयपीएलची पूर्वतयारी सुरु आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) हार्दिक पांड्यासह मुंबईचे खेळाडू सराव सत्रात घाम गाळताना दिसून येत आहेत. मुंबई इंडियन्सचे बॅटसमन आणि बॉलर्स पहिल्या मॅचसाठी सराव करताना पाहायला मिळाले.
रोहित शर्माची नेट प्रॅक्टिसमध्ये फटकेबाजी
सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सचा माजी कॅप्टन रोहित शर्माचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हि़डिओत रोहित शर्मा नेट प्रॅक्टिस करत असल्याचं पाहायला मिळतं. नेट प्रॅक्टिसवेळी रोहित शर्मानं चौकार षटकार लगावले आहेत. रोहित शर्मा सरावावेळी मोठे फटके मारताना दिसून आला. रोहित शर्मा ज्या प्रकारे फटके मारताना दिसून येतो त्यामुळं विरोधी टीमच्या गोलंदाजांचं टेन्शन नक्की वाढलं आहे. रोहित शर्माचाव्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी देखील त्याच्यावर प्रतिक्रिया देत आहेत.
मुंबई पाचवेळा आयपीएल चॅम्पियन
मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाचवेळा आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईनं 2013, 2015,2017,2019 आणि 2020 च्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबईनं पाचवेळा विजेतेपद पटकावलं आहे.मुंबई इंडियन्सशिवाय चेन्नई सुपर किंग्जनं देखील पाचवेळा आयपीएलचं विजेतेपद मिळवंल आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नावावर देखील चेन्नईला पाचवेळा विजेतेपद मिळवून देण्याचा विक्रम आहे.
दरम्यान, 2021 ते 2023 मधील तीन आयपीएलमध्ये मुंबईची कामगिरी समाधानकारक राहिलेली नाही. रोहित शर्मा आता मुंबईचा कॅप्टन नसून टीम मॅनेजमेंटनं हार्दिक पांड्याला पुन्हा संघात घेत त्याच्यावर नेतृत्त्वाची जबाबदारी दिली आहे. रोहित शर्मा यामुळं कोणत्याही दबावाशिवाय स्पर्धेत खेळू शकतो.
रोहित शर्माची आयपीएलमधील कारकीर्द
रोहित शर्मानं आयपीएलमध्ये 243 मॅचेस खेळल्या आहेत. त्यानं यामध्ये 6211 धावा केल्य आहेत. आयपीएलमध्ये रोहितच्या नावावर एक शतक असून त्याची 109 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. याशिवाय त्यानं 42 अर्धशतकं केली आहेत. रोहितनं 130.05 च्या स्ट्राइक रेटनं आणि 29.58 च्या सरासरीनं 6211 धावा केल्या आहेत.रोहितनं 2013 ते 2023 पर्यंत मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व केलं. रोहितला 2013 मध्ये पहिल्यांदा मुंबईचं नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली होती, त्याच हंगामात मुंबईला स्पर्धेतील पहिलं विजेतेपद मिळालं होतं.
संबंधित बातम्या :
उद्यापासून रंगणार आयपीएलचा महासंग्राम; चेपॉक सज्ज, ए.आर. रहमानसह कोण परफॉर्मन्स करणार?, जाणून घ्या