Latest News Marathi: IPL 2024: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने (Suresh Raina) 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2021 मध्ये त्याने शेवटचा आयपीएल हंगाम खेळला होता. त्यानंतर तो कधीही आयपीएलमध्ये दिसला नाही. सुरेश रैना अनेक वर्षे चेन्नईकडून खेळला आणि त्याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संघाला 4 वेळा विजेतेपद मिळवून दिले.
आता सुरेश रैना समालोचकाची भूमिका निभावत असतो. सुरेश रैना यावेळी उघडपणे आपलं मत मांडतो. सध्या एका कार्यक्रमात सुरेश रैनाने महत्वाचं विधान केलं आहे. सुरेश रैनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुरेश रैनाने आयपीएल 2024 च्या हंगामात कोण बाजी मारणार, याबाबत भविष्यवाणी केली आहे.
आयपीएल 2024 चा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे, पहिला सामना देखील चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (Royal Challegers Bangaluru) यांच्यात होणार आहे. याचदरम्यान यंदाचा आयपीएलचा प्रमुख दावेदार आरसीबीचा संघ असल्याचं सुरेश रैनाने सांगितले आहे. आरसीबी एक उत्कृष्ट संघ आहे आणि संघाचे चाहते त्यांना नेहमीच पाठिंबा देतात. आयपीएल 2024 ची ट्रॉफी जिंकण्यासाठी आरसीबी प्रबळ दावेदार असल्याची भविष्यवाणी सुरेश रैनाने केली आहे. त्यामुळे रैनाची ही भविष्यवाणी खरी होणार का, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. तसेच सुरेश रैनाची ही भविष्यवाणी चेन्नई आणि एमएस धोनीच्या चाहत्यांना न आवडणारी आहे, हे नक्की.
पाहा IPL 2024 वेळापत्रक-
22 मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री 8 वा.पासून, चेन्नई23 मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वा. पासून, मोहाली23 मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री 8 वा. पासून, कोलकाता24 मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी 3.30 वा.पासून, जयपूर24 मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, अहमदाबाद25 मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री 8 वा. पासून, बंगळुरू26 मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री 8 वा.पासून, चेन्नई27 मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, हैदराबाद28 मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री 8 वा. पासून, जयपूर29 मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री 8 वा. पासून, बंगळुरू30 मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री 8 वा. पासून, लखनौ31 मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी 3.30 वा. पासून, अहमदाबाद31 मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री 8 वा. पासून, विशाखापट्टणम1 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री 8 वा. पासून, मुंबई2 एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री 8 वा. पासून, बंगळुरू3 एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री 8 वा. पासून, विशाखापट्टणम4 एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री 8 वा. पासून, अहमदाबाद5 एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री 8 वा. पासून, जयपूर6 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वा.पासून, मुंबई7 एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री 8 वा. पासून, लखनौ