IPL 2024 Latest Marathi News: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) डिसेंबरमध्ये लिलावात खरेदी केलेला श्रीलंकेचा गोलंदाज दिलशान मदुशंका (Dilshan Madhushanka)   दुखापतीमुळे आयपीएल 2024 च्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईने दिलशान मधुशंकाच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज क्वेना माफकाला (Kwena Maphaka) संघात घेतले आहे. 


नुकत्याच झालेल्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत 17 वर्षीय माफकाने चमकदार कामगिरी केली होती. अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत माफका प्रतिस्पर्धी संघावर भारी पडला होता. तसेच ICC U19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले होते. यावेळी माफका आयपीएलच्या लिलावात सहभागी झाला होता, मात्र त्याला कोणीही विकत घेतले नाही. आता तो मुंबईच्या संघात सामील झाला आहे. माफकाने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. म्हणजेच तो आता अनकॅप्ड खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये सामील झाला आहे. आयपीएलच्या लिलावात मफकाची मूळ किंमत 20 लाख रुपये होती.


श्रीलंकेचा गोलंदाज दिलशान मदुशंका हा तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशच्या दौऱ्यावर होता, जिथे त्याला दुसऱ्या वन डे सामन्यादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे त्याला दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. मदुशंका मुंबईसाठी आयपीएलमध्ये पदार्पण करणार होता, मात्र आता त्याला प्रतीक्षा करावी लागेल. 2024 च्या आयपीएल लिलावात मदुशंकाला मुंबईने 4.60 कोटींत आपल्या ताफ्यात घेतले होते. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दिलशानने श्रीलंकेसाठी सर्वाधिक बळी घेतले होते. 


मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना तगडा अनुभव-


विशेषतः फलंदाजीच्या बाबतीत मुंबई इंडियन्स खूप मजबूत दिसत आहेत. रोहित शर्मा आणि इशान किशन संघासाठी सलामीला येऊ शकतात. रोहित आणि इशानचा अनुभव मुंबईसाठी खूप उपयोगी ठरू शकतो. तिलक वर्माने गेल्या दोन हंगामात 300 हून अधिक धावा करून खूप अनुभव मिळवला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त, संघाकडे सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड आणि हार्दिक पंड्या यांच्या रूपात आंतरराष्ट्रीय स्तरावरील मजबूत फलंदाज आहेत. गेल्या हंगामाबद्दल बोलायचे झाल्यास मुंबईने अनेकवेळा 200 हून अधिक धावांचा पाठलाग केला होता.


आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ-


हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, आकाश मढवाल, अंशुक कंबोज, अर्जुन तेंडुलकर, डेवॉल्ड ब्रेव्हिस, क्वेना माफका, गेराल्ड कोएत्झी, इशान किशन, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेया, मोहम्मद नबी, नमन धीर, नेहाल वढेरा, नुवान तुशारा, पीयूष चावला, रोमारिओ शेफर्ड, शाम्स मुलानी, शिवलिक शर्मा, श्रेयस गोपाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद.


संबंधित बातम्या:


आयपीएलमध्ये ५ सामन्यात २ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाची मोहम्मद शमीच्या जागी वर्णी; गुजरातची टायटन्सची घोषणा