AI images Cricketers : आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळं (Artifical Intelligence) तंत्रज्ञान (Technology) युगात मोठे बदल घडत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) याच्यामुळे अनेकांच्या कलागुणांना वाव मिळाला.. अनेकजण याचा वापर करत नवनवे प्रयोग करत आहेत. एआयच्या  मदतीनं आपण आज अशा अशा गोष्टी करू शकतो ज्यांची यापूर्वी कल्पना सुद्धा केली नव्हती.. भारतीय क्रिकेटपटू म्हातारपणी कसे दिसू शकतात.. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ... हे फोटो एआयच्या मदतीने तयार केलेले आहेत. मिडजर्नी याचा वापर करत हे फोटो तयार करण्यात आले आहेत. 


कलाकार एसके एमडी अबू साहिद यांनी मिडजौनी याचा वापर करत उतारवयात क्रिकेटपटू कसे दिसू शकतात... ते समोर आणलेय. हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली, केएल राहुल, रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, चेतेश्वर पुजारा आणि रविंद्र जडेजा यांच्या फोटोंचा समावेश आहे. हे क्रिकेटपचू उतारवयात कसे दिसतात.. हे दाखवण्यात आलेय.  sahixd या इन्स्टाग्राम खात्यावर हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. भारतीय क्रिकेटर म्हातारपणी कसे दिसतात, एआय ने चित्रित केलेय.. असे  पोस्टमध्ये म्हटलेय.


पाहा इन्स्टाग्राम पोस्ट---





 
 
एआय म्हणजे काय ?


एआय ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. एआय म्हणजे मानवी बुद्धिमत्तेसारखे शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये आणि त्या मशीनमधल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनेक क्षेत्रात वापर केला जातो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने मशीन, कॉम्प्युटर आणि यंत्र बनवून भविष्यात महत्वाची कामे करण्यासाठी मानवाच्या बदली वापर केला जाऊ शकतो. म्हणजेच कोणतेही कठीण काम एका बुद्धिमान मशीनमार्फत केले जाऊ शकते. तसेच मशीनचा वापर 24 तास केला जाऊ शकतो. त्यामुळे जास्त उपयोग करता येऊ शकतो.


आणखी वाचा :  


IPL 2023 : चढाओढ फक्त तुमच्या डोक्यात, खरी स्पर्धा... नवीन उल हकनंतर विराट कोहलीची पोस्ट चर्चेत 


Video: 23 वर्षीय नवीन उल हक, केवळ विराटच नव्हे तर आफ्रिदी, परेरा आणि डॉर्सीलाही भिडला!


पुन्हा भिडले... ! गौतम गंभीर-नवीन अन् लखनौने विराट कोहलीला डिवचले, किंगचे चाहते भडकले