Gujarat Titans vs Mumbai Indians : आयपीएलच्या 15 व्या हंगामात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात टाइटन्स (Gujarat Titans) यांच्यामध्ये आयपीएलचा 51 वा सामना सुरु आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये फ्लॉप ठरलेल्या रोहित शर्माने गुजरातविरोधात तुफानी फटकेबाजी केली. गुजरातविरोधात रोहित शर्माने सुरुवातीपासून विस्फोटक फलंदाजी केली. रोहित शर्माने 43 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान रोहित शर्माने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहित शर्माने गुजरातविरोधात दोन षटकार लगावत मुंबईकडून 200 षटकार लावणाऱ्या खेळाडूंमध्ये स्थान मिळवलेय.
दोन षटकार लगावत मुंबईकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादील रोहित शर्माने स्थान पटकावलेय. मुंबईकडून पोलार्डने सर्वाधिक षटकार लगावले आहेत. पोलार्डच्या नावावर 157 षटकारांची नोंद आहे. रोहित शर्माच्या नावावर 201 षटकार आहेत. रोहित शर्मा मुंबईकडून सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या खेळाडूमध्ये दुसऱ्या क्रमांकवर आहे.
षटकारांची संख्या खेळाडूचे नाव 257 पोलार्ड 201* रोहित शर्मा 98 हार्दिक पांड्या 84 अंबाती रायडू65* ईशान किशन
कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांची वादळी सुरुवात त्यानंतर टीम डेविडच्या फिनिशिंग टचच्या जोरावर मुंबईने निर्धारित 20 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात 177 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 43,ईशान किशन 45 आणि टीम डेविड 44 धावांची खेळी केली. गुजरातला विजयासाठी 178 धावांचे आव्हान देण्यात आलेय.
मुंबईच्या संघात एक बदल -गुजरातच्या संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. मागील सामन्यातील संघ कायम ठेवण्यात आलाय. तर मुंबईच्या संघात एक बदल करण्यात आलाय. मुंबईने ह्रतिक शौकीनच्या जागी एम. अश्विनला स्थान दिलेय.. मुंबईच्या संघात आजही अर्जुन तेंडुलकरला स्थान दिले नाही.
मुंबईचा संघ - रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टिम डेव्हिड, डॅनिएल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह, रायली मेरेडेथ
गुजरातचा संघ - ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या(कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशीद खान, प्रदीप सांगवान, लॉकी फर्ग्यूसन, अलजारी जोसेफ, मोहम्मद शमी