GT vs MI, IPL 2022 : गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडिअमवर टेबल टॉपर गुजरात आणि तळाशी असणाऱ्या मुंबई इंडियन्समध्ये सामना रंगणार आहे. पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामात खराब कामगिरी झाली आहे. मुंबईला सलग आठ पराभवाचा सामना करावा लगाला. नऊ सामन्यात मुंबईला फक्त एकच विजय मिळवता आलाय. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. मुंबईचा नेटरनरेटही -0.836 इतका आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने प्लेऑफमधील जागा जवळपास निश्चित केली आहे. एका विजयानंतर गुजरातचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. त्याशिवाय लखनौ, राजस्थान, आरसीबी, दिल्ली, पंजाब आणि हैदराबाद आणि कोलकाता या संघामध्ये उर्वरित स्थानासाठी लढत असणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई इतर संघाचे प्लेऑफचे स्थान धोक्यात आणू शकतात. या संघाचे प्लेऑफमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलेय. आज मुंबईचा सामना गुजरातविरोधात होणार आहे.
मुंबईच्या संघात एक बदल -
गुजरातच्या संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. मागील सामन्यातील संघ कायम ठेवण्यात आलाय. तर मुंबईच्या संघात एक बदल करण्यात आलाय. मुंबईने ह्रतिक शौकीनच्या जागी एम. अश्विनला स्थान दिलेय.. मुंबईच्या संघात आजही अर्जुन तेंडुलकरला स्थान दिले नाही.
मुंबईचा संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टिम डेव्हिड, डॅनिएल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह, रायली मेरेडेथ
गुजरातचा संघ -
ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या(कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशीद खान, प्रदीप सांगवान, लॉकी फर्ग्यूसन, अलजारी जोसेफ, मोहम्मद शमी
सांघिक कामगिरीच्या जोरावर गुजरात संघाने सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारी कामगिरी केली आहे. गुजरातने विजय मिळवलेल्या प्रत्येक सामन्याचा हिरो वेगळा आहे. कुणा एका खेळाडूच्या बळावर गुजरातचा संघ नाही. हीच गुजरातची जमेची बाजू आहे. गुजरातच्या संघाचा प्लेऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित झालाय. तर दुसरीकडे प्लॉऑफच्या स्पर्धेतून बाहेर गेलेला मुंबईचा संघ आत्मसन्मानासाठी मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांचा फॉर्म मुंबईसाठी चिंतेची बाजू आहे. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी सातत्याने धावा जमवल्या आहेत. पण इतर फलंदाजांकडून साथ न मिळाल्यामुळे मुंबईला पराभवाला सामोरं जावे लागलेय. गोलंदाजीतही सातत्य दिसत नाही. बुमहाराचा माराही यंदा फिका दिसत आहे. मुंबईचा संघ दुसऱ्या विजयासाठी मैदानावर उतरेल.