IPL 2022, Rishabh Pant Viral Video : आयपीएलमधील 41 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकात्याचा चार विकेटने पराभव केला. कोलकात्याचा हा लागोपाठ पाचवा पराभव होता. या पराभवामुळे कोलकात्याचं प्लेऑफमधील आव्हान खडतर झालेय. कोलकात्याने दिलेले 146 धावांचे आव्हान दिल्लीने 19 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर पार केले. या सामन्यात ऋषभ पंत पुन्हा एकदा पंचासोबत हुज्जत घालताना दिसला. यामुळे पंतला दंड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंचासोबत हुज्जत घालतानाचा पंतचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. 


दिल्लीचा  (DC) कर्णधार ऋषभ पंत पुन्हा एकदा पंचासोबत हुज्जत घालताना दिसला. कोलकाताविरोधात झालेल्या सामन्यात पंत पंचासोबत हुज्जत घालताना दिसला. गोलंदाजीदरम्यान 17 व्या षटकात हा प्रकार झाला. ललीत यादवने फुलटॉस चेंडू फेकला. नीतीश राणाने या चेंडूवर षटकार लगावला. हा चेंडू कंबरेच्या वरती असल्यामुळे पंचाने नोबॉल दिला. त्यानंतर पंचाचा हा निर्णय ऋषभ पंतला खटकला. त्यानंतर तो पंचासोबत जाऊन हुज्जत घालत होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. याआधाही एका सामन्यात पंतला पंचासोबत हुज्जत घालताना दिसला होता. त्यामुळे त्याला आर्थिक दंडाचा सामनाही करावा लागला होता. 
 





राजस्थानच्या सामन्यात दिवशी नेमकं काय घडलं?
राजस्थान-दिल्ली सामन्यातील अखेरच्या षटकात दिल्लीच्या संघाला विजयासाठी 6 चेंडूत 36 धावा करायच्या होत्या. दरम्यान, मैदतान उपस्थित असलेल्या दिल्लीचा तडाखेबाज फलंदाजरोव्हमन पॉवेलनं पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार मारून दिल्लीच्या आशा उंचावल्या. महत्वाचं म्हणजे, ओबेड मॅकॉयनं टाकलेला तिसरा चेंडू फूल टॉस होता. या चेंडूला दिल्लीच्या संघानं नो-बॉल देण्याची मागणी केली. मात्र, मैदानावरील पंचांनी नो-बॉल दिला नाही. पंचांच्या निर्णयावर कर्णधार ऋषभ पंतनं नाराजी व्यक्त केली. तसेच दिल्लीच्या फलंदाजाला मैदानाबाहेर येण्याचा इशारा देखील केला होता.


हे देखील वाचा-