RR vs RCB Dream 11 Prediction Match 19th : आयपीएलमध्ये आज रॉयल लढत होणार आहे. राजस्थानपुढे आरसीबीचं आव्हान असेल. राजस्थानचा संघ सध्या भन्नाट फॉर्मात आहे. राजस्थानने आपल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवलाय, ते गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे आरसीबीला तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. आरसीबी चार सामन्यात दोन गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. राजस्थान आज लागोपाठ चौथ्या विजयासाठी मैदानात उतरेल, तर आरसीबी विजयी लय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. राजस्थान आणि आणि आरसीबी या दोन्ही संघाचे आघाडीचे फलंदाज फेल ठरत आहेत. विराट कोहली याचा अपवाद वगळता आरसीबीची फलंदाजी ढेपाळल्याचे दिसतेय. ग्लेन मॅक्सवेल, फाफ डु प्लेसिस, कॅमरुन ग्रीन आणि रजत पाटीदार यांना मोठी धावसंख्या काढता आली नाही. दुसरीकडे राजस्थानचीही अवस्था तशीच आहे. संजू सॅमसन, यशस्वी जायस्वाल आणि जोस बटलर अद्याप फेल गेले आहेत. आजच्या सामन्यात कोण शानदार कामगिरी करणार, याकडे नजरा असतील.
आरसीबीची गोलंदाजांना अद्याप प्रभावी मारा करता आला नाही. सिराज, रीस टोपली, अल्जारी जोसेफ, कॅमरुन ग्रीन सर्व गोलंदाज फेल ठरलेत. दुसरीकडे राजस्थानची गोलंदाजी प्रभावी ठरली आहे. ट्रेंट बोल्ट सुरुवातीला धक्के देतोय. त्यानंतर मधल्या षटकांमध्ये युजवेंद्र चहल भेदक मारा करतो.. तर तळाला संदीप शर्मा धावांची गती रोखतो. त्यामुळे आजच्या सामन्यात राजस्थानचे पारडं जड वाटतेय. पण आकडेवारी पाहिली तर आरसीबीकडून तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. पाहूयात आजच्या सामन्यासाठी ड्रीम 11 कशी ( RR vs RCB Dream 11 Prediction Match 19th ) असेल... कोणत्या खेळाडूवर पैसे लावाल.. कोणते खेळाडू तुम्हाला मालामाल करतील.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ड्रीम11 प्रिडिक्शन ( RR vs RCB Dream 11 Prediction Match 19th )
विकेटकीपर: जोस बटलर ( Josh buttler ), संजू सॅमसन ( Sanju Samson ).
फलंदाज : यशस्वी जायस्वाल( Yashasvi Jaiswal ), विराट कोहली ( Virat Kohli ), फाफ डु प्लेसिस ( Faf Du Plessi ).
अष्टपैलू : ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell ), कॅमरून ग्रीन ( Cameron Green ), रियान पराग ( Riyan Parag ).
गोलंदाज : रीस टॉपले ( Rice Topley ), युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ), ट्रेंट बोल्ट ( Trent Boult ).
कर्णधार: Choice 1: विराट कोहली ( Virat Kohli ) | उपकर्णधार : ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell ).
कर्णधार: Choice 2: युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) | उपकर्णधार: संजू सॅमसन ( Sanju Samson ).