Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore : आयपीएलच्या 17 व्या हंगामात आज रॉयल लढत होणार आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स अन् फाफच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये आज संध्याकाळी आमनासामना होणार आहे. राजस्थानचा संघ सध्या तुफान फॉर्मात आहे. लागोपाठ तीन सामन्यात राजस्थानने विजय मिळवला असून ते अजय आहेत. दुसरीकडे आरसीबीला तीन सामन्यात पराभवाच सामना करावा लागला आहे. आजचा सामना जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियमवर होणार आहे. राजस्थान आणि आरसीबी हे दोन्ही संघ मागील 16 हंगामात एकमेंकासमोर आल्या आहेत. हेड टू हेड आकडे काय सांगतात, संभाव्य प्लेईंग 11 कशी असेल? पिच रिपोर्ट काय सांगते? हवामान कसं असेल? याबाबत जाणून घेऊयात.. 


हेड टू हेड आकडे काय सांगतात? वरचढ कोण ?


हेड टू हेड आकडे पाहिल्यास आरसीबीचे पारडे जड दिसत आहे. रासजस्थान आणि आरसीबी यांच्यामध्ये आतापर्यंत 30 वेळा लढत झाली आहे.  ज्यामध्ये आरसीबीने 15 सामने जिंकले आहेत तर राजस्थान संघाने 12 वेळा विजय मिळवला आहे.  धावांचा पाठलाग करताना आरसीबीने 10 तर राजस्थानने 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर प्रथम फलंदाजी करताना दोन्ही संघाने प्रत्येकी पाच पाच सामन्यात विजय मिळवला आहे. तीन सामन्यात कोणताही निकाल लागला नाही.


दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग 11 : 


 आरसीबी 


विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स/कॅमरुन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), कर्ण शर्मा, रीस टॉपले, मोहम्मद सिराज, यश दयाल। 


राजस्थान रॉयल्स 


यशस्वी जयसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान/संदीप शर्मा, नंद्रे बर्गर, युजवेंद्र चहल 


सवाई मानसिंह स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल ?


जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियमच्या (Sawai Man Singh Stadium Jaipur) खेळपट्टी फलंदाजांना पोषक आहे. पण येथे गोलंदाजांनाही तेवढीच संधी मिळते. स्टेडियम मोठं असल्यामुळे चौकार-षटकार लगावण्यासाठी फलंदाजांना मेहनत घ्यावी लागते. अचूक टप्प्यावर मारा केल्यास खेळपट्टी गोलंदाजांनाही मदत करते. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतो. 


दोन्ही संघाच्या ताफ्यात कोण कोण ?


राजस्थान: यशस्वी जायसवाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, आर अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युजवेंद्र चहल, तनुष कोटियान, आबिद मुश्ताक, शुभम दुबे, डेनोवन फरेरा, टॉम कोहलर कॅडमोर, रोवमन पॉवेल, कुणाल सिंह राठौर, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन.


आरसीबी : विराट कोहली, फाफ डुप्लेसी (कर्णधार), कॅमरन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), रीस टॉप्ली, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल, आकाशदीप, मनोज भंडागे, सौरव चौहान, टॉम करन, लॉकी फर्ग्यूसन, विल जैक्स, अल्जारी जोसेफ, महिपाल लोमरोर, सुयश प्रभुदेसाई, राजन कुमार, हिमांशु शर्मा, कर्ण शर्मा, स्वप्निल सिंह, विजयकुमार वैशाख.