RCB Vs SRH: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स (Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad) एकमेकांशी भिडणार आहेत. या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीच्या संघानं सात पैकी पाच सामने जिंकले आहेत. तर, या हंगामातील सुरुवातीचे दोन सामने गमवल्यानंतर हैदराबादच्या संघानं जोरदार कमबॅक करत सलग चार सामने जिंकले आहेत. आजचा सामना दोन्ही  संघासाठी महत्वाचा आहे. यामुळं आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलच्या इतिहासात रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद हे संघ तब्बल 20 वेळा आमने-सामने आले आहेत. आकडेवारी वर नजर टाकली असता हैदराबादचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. हैदराबादनं 11 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, बंगळुरुनं 8 सामन्यात जिंकण्यात यश मिळवलं आहे. पण यंदा बंगळुरुचा फॉर्म अधिक चांगला आहे. त्यामुळं दोघांती आजचा सामना चुरशीचा होऊ शकतो हे नक्की. 


आरसीबी प्लेईंग इलेव्हन: 
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवूड, मोहम्मद सिराज. 


सनरायजर्स हैदराबाद प्लेईंग इलेव्हन: 
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकिपर), शशांक सिंह, जगदीशा सुचित, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, उमरान मलिक, टी नटराजन.



हे देखील वाचा-