IPL 2022, No Ball Controversy : दिल्ली कॅपिट्लस आणि राजस्थान रॉयल्स (DC vs RR) यांच्यात झालेल्या सामन्याच्या अखेरच्या षटकात राडा झाला होता. पंचाच्या निर्णायावर नाराज झाल्यानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने फलंदाजांना माघारी बोलवलं होतं. इतकेच नाही तर सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांनी सामन्यादरम्यान मैदानावर जात पंचांशी हुज्जत घातली. यंदाच्या हंगमातील हा पहिला वाद मानला जात आहे. यावर क्रीडा तज्ज्ञांनीही आपपाल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


 नेमकं काय झालं होतं?
अखेरच्या षटकात दिल्लीच्या संघाला विजयासाठी 6 चेंडूत 36 धावा करायच्या होत्या. दरम्यान, मैदतान उपस्थित असलेल्या दिल्लीचा तडाखेबाज फलंदाजरोव्हमन पॉवेलनं पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार मारून दिल्लीच्या आशा उंचावल्या. महत्वाचं म्हणजे, ओबेड मॅकॉयनं टाकलेला तिसरा चेंडू फूल टॉस होता. हा चेंडू कंबरेच्या वरती असल्याचे दिसत होतं. त्यामुळे या चेंडूला दिल्लीच्या संघानं नो-बॉल देण्याची मागणी केली. मात्र, मैदानावरील पंचांनी नो-बॉल दिला नाही. पंचांच्या निर्णयावर कर्णधार ऋषभ पंतनं नाराजी व्यक्त केली. तसेच दिल्लीच्या फलंदाजाला मैदानाबाहेर येण्याचा इशारा केला. त्याचवेळी शार्दुल ठाकूरही आपल्या कर्णधाराला पाठिंबा देत पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना दिसला. तसेच कर्णधाराच्या सांगण्यावरून प्रवीण आमरे यांनी  मैदानात जाऊन अंपायरशी वाद घातला.


नो बॉलचा नियम काय? 
मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) च्या नियम 41.7.1 नुसार, एखादा फुल टॉस चेंडू फलंदाजाच्या कंबरेपेक्षा जास्त उंचीने असेल तर तो अवैध्य असतो. पंच त्या चेंडूला नो बॉल देऊ शकतात. अशात रोवमन पॉवेलला टाकलेला चेंडू अनेकांना नो बॉल असल्याचं वाटतेय. माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यांनी ट्विट करत हा नो बॉल असल्याचं मत नोंदवलं आहे.  


डगआऊटमध्ये बसलेल्या दिल्लीच्या खेळाडूंना तिसरा खेळाडू कंबरेच्या वरती असल्याचं दिसले. त्यानंतर राडा झाला. या वादग्रस्त निर्णायासाठी तिसऱ्या पंचाची मदत का घेतली नाही? तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली जाऊ शकत नाही का? असा प्रश्न दिल्लीच्या खेळाडूंनीही उपस्थित केला....  


पंच आपल्या निर्णायावर ठाम -
वादग्रस्त तिसऱ्या चेंडूला पंचांनी नो बॉल दिले नाही. दिल्लीला विजयासाठी तीन चेंडूत 18 धावांची गरज होती. जर पंचांनी तो चेंडू नो बॉल दिला असता तर फ्री हिटसोबत दिल्लीला चार चेंडूत 17 धावा राहिल्या असत्या. त्यामुळे कदाचीत सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. पण पंच आपल्या निर्णायावर ठाम राहिले. त्यानंतर सामना सुरु झाल्यानंतर दिल्लीचा 15 धावांनी पराभव झाला. 
 
थर्ड अंपायरची मदत का नाही?
दिल्लीच्या सामन्यात वाद झाल्यानंतर तिसऱ्या पंचांची मदत का नाही घेतली? असा प्रश्न उपस्थित झाला. पण आयपीएलच्या नियमांनुसार, ऑन फील्‍ड अंपायर खेळाडूला बाद दिल्यानंतरच तिसऱ्या पंचाची मदत घेऊ शकतो. त्याशिवाय इतर निर्णासाठी ऑन फिल्ड अंपायरला तिसऱ्या पंचाकडे इतर निर्णायासाठी दाद मागता येत नाही. आयपीएल प्‍लेइंग कंडीशन्सनुसार, मैदानावरील पंच फक्त बाद झाल्यानंतर आणि फ्रंट फुट नो बॉलच्या निर्णायासाठी तिसऱ्या पंचाची मदत घेऊ शकतो.  आयपीएलच्या नियमानुसार, जर एखाद्या चेंडूवर विकेट पडली असेल तरच  थर्ड अंपायर नो बॉल तपासतो. आयपीएलच्या नियमांनुसार  नितिन मेनन आणि निखिल पटवर्धन यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता.