RCB vs SRH: आयपीएलमध्ये आज संध्याकाळी 52 वा सामना खेळला जाईल. आजच्या सामन्यात केन विल्यमसनचा सनरायझर्स हैदराबादचा सामना विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसोबत होईल. एकीकडे विराटची टीम बँगलोरने प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे, तर केनच्या नेतृत्वाखाली या आयपीएलमध्ये खेळणारा हैदराबादचा संघ आयपीएल 2021 मधून बाहेर पडणारा पहिला संघ आहे.


आजच्या सामन्यात विराट कोहलीची टीम सनरायझर्सला पराभूत करुन बँगलोर प्लेऑफमध्ये दुसऱ्यास्थानी जाण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर असलेल्या हैदराबादचा संघ प्लेऑफमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचण्यापासून बेंगळुरूला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसेल.



मोठी धावसंख्या होण्याची शक्यता
आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अबू धाबीच्या स्टेडियमवर खेळला जाईल. या मैदानावर फलंदाजांनी आतापर्यंत भरपूर धावा केल्या आहेत, आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन धावांचा पाठलाग करणे पसंत करेल.


SRH vs RCB Head to Head
आयपीएलच्या इतिहासात बंगळुरू आणि हैदराबादचा संघ एकूण 18 वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान, विल्यमसनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादचा संघ पुढे आहे. हैदराबादने बंगळुरूविरुद्ध आतापर्यंत 10 सामने जिंकले आहेत. तर कोहलीचा आरसीबी केवळ आठ सामने जिंकू शकले.


अशी असेल Playing 11
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर - विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीकल, श्रीकर भारत (विकेटकिपर), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डेन ख्रिश्चन, शाहबाज अहमद, जॉर्ज गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.


सनरायझर्स हैदराबाद - जेसन रॉय, रिद्धिमान साहा (विकेटकिपर), केन विल्यमसन (कर्णधार), प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, उम्रान मलिक.


दोन्ही संघ बदल न करता उतरू शकतात
बंगळुरूचा संघ कोणत्याही बदलाशिवाय या सामन्यात उतरण्याची शक्यता आहे. या सामन्यात संघ मधल्या फळीत स्फोटक फलंदाज मॅक्सवेलकडून आणखी एका मोठ्या खेळीची अपेक्षा करेल. त्याचबरोबर मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्स फॉर्मात येण्याचीही टीमची अपेक्षा असेल.


दुसरीकडे, हैदराबाद संघ देखील या सामन्यात कोणताही बदल न करता खेळू शकतो. या सामन्यात सर्वांची नजर हैदराबादचा वेगवान गोलंदाज उम्रान मलिकवर असेल.