RCB vs RR, IPL 2023 Live : आरसीबीचा राजस्थानवर विजय

IPL 2023, RCB vs RR : आरसीबी आणि राजस्थानमध्ये लढत होणार आहे. बेंगलोरच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने असतील...

नामदेव कुंभार Last Updated: 23 Apr 2023 07:30 PM
आरसीबीचा राजस्थानवर रॉयल विजय

आरसीबीचा राजस्थानवर रॉयल विजय

आर. अश्विन बाद

आर. अश्विन बाद... तीन चेंडूत दहा धावांची गरज असताना अश्विन बाद

मोक्याच्या क्षणी शिमरोन हेटमायर बाद

मोक्याच्या क्षणी शिमरोन हेटमायर बाद

राजस्तानला लागोपाठ दोन धक्के, जायस्वाल आणि संजू बाद

राजस्तानला लागोपाठ दोन धक्के, जायस्वाल आणि संजू बाद

राजस्थानला दुसरा धक्का, अर्धशतकानंतर पडिक्कल बाद

राजस्थानला दुसरा धक्का, अर्धशतकानंतर पडिक्कल बाद झाला... विलीच्या चेंडूला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पडिक्कल झेल देऊन बाद झाला

देवदत्त पडिक्कल याचे अर्धशतक

देवदत्त पडिक्कल याचे अर्धशतक... ३० चेंडूत झळकावले अर्धशतक

मोहम्मद सिराजची भेदक चेंडू, जोस बटलर शून्यावर बाद

मोहम्मद सिराजची भेदक चेंडू, जोस बटलर शून्यावर बाद

RCB vs RR, IPL 2023 Live : राजस्थानला विजयासाठी 190 धावांचे आव्हान

RCB vs RR, IPL 2023 Live : राजस्थानला विजयासाठी 190 धावांचे आव्हान

आरसीबीला आणखी एक धक्का

आरसीबीला आणखी एक धक्का बसला आहे. वैशाक विजयकुमार बाद झाला

आरसीबीला आठवा धक्का, कार्तिक बाद

आरसीबीला आठवा धक्का, कार्तिक बाद

आरसीबीला सातवा धक्का, हसरंगा बाद

आरसीबीला सातवा धक्का, हसरंगा बाद

RCB vs RR, IPL 2023 Live : आरसीबीला सहावा धक्का, सुयेश प्रभुदेसाई धावबाद

RCB vs RR, IPL 2023 Live : आरसीबीला सहावा धक्का, सुयेश प्रभुदेसाई धावबाद

आरसीबीचा अर्धा संघ तंबूत, महिपाल लोमरार बाद

आरसीबीचा अर्धा संघ तंबूत, महिपाल लोमरार बाद

मोक्याच्या क्षणी मॅक्सवेल बाद

मोक्याच्या क्षणी मॅक्सवेल बाद झाला आहे. अश्विनला स्विच हिट मारण्याच्या प्रयत्नात मॅक्सवेल बाद झाला

आरसीबीला मोक्याच्या क्षणी तिसरा धक्का

आरसीबीला मोक्याच्या क्षणी तिसरा धक्का बसला आहे. फाफ डु प्लेलिस धावबाद झालाय... जायस्वाल याने अचूक फेकी करत फाफला तंबूत पाठवले. फाफने ६२ धावांची खेळी केली.

फाफ डु प्लेलिसचे अर्धशतक

ग्लेन मॅक्सवेलनंतर फाफ डु प्लेलिसचे अर्धशतक..... यंदाच्या हंगामातील पाचवे अर्धशतक झळकावले.... 

मॅक्सवेलचे अर्धशतक

मॅक्सवेलचे  दमदार अर्धशतक.. २७ चेंडूत झळकावले अर्धशतक

मॅक्सवेल-फाफची फटकेबाजी, आरसीबीचा डाव सावरला

मॅक्सवेल-फाफची फटकेबाजी, आरसीबीचा डाव सावरला.. आठ षटकानंतर आरसीबी दोन बाद ७८ धावा

आरसीबीला दुसरा धक्का, शाहबाज अहमद बाद

आरसीबीला दुसरा धक्का, शाहबाज अहमद बाद

पहिल्याच चेंडूवर विराट कोहली बाद

पहिल्याच चेंडूवर विराट कोहली बाद

आरसीबीची प्रथम फलंदाजी

राजस्थान आणि बेंगलोर या दोन संघामध्ये रॉयल सामना होत आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने बेंगलोरच्या मैदानावर नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. आरसीबी प्रथम फलंदाजी करणार आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली नाणेफेकीनंतर प्रथम फलंदाजी करायला आवडेल असे सांगितलेय. गुणतालिकेत राजस्थान सध्या पहिल्या स्थानावर आहे. तर आरसीबीचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत पुढे जाण्यासाठी आजचा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरतील. आरसीबीच्या संघात क बदल करण्यात आला आहे. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग 11 

RCB vs RR, IPL 2023 Live : राजस्थानने नाणेफेक जिंकली

RCB vs RR, IPL 2023 Live : राजस्थानने नाणेफेक जिंकली... प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

RCB vs RR, IPL 2023 Live : थोड्याच वेळात नाणेफेक होणार

RCB vs RR, IPL 2023 Live : थोड्याच वेळात नाणेफेक होणार

M. Chinnaswamy Stadium Pitch Report : चिन्नास्वामी स्टेडियम खेळपट्टीचा अहवाल

बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. येथे गोलंदाजांना खास कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरूमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा करूनच फलंदाजांवर दबाव आणता येतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा होईल.

RCB vs RR Head To Head : हेड टू हेड आकडेवारी

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई (MI) आणि पंजाब (PBKS) या संघांमध्ये आतापर्यंत 28 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये बंगळुरु संघाचं पारड किंचित जड दिसून आलं आहे. आरसीबी संघाने 28 पैकी 13 सामने जिंकले आहेत, तर राजस्थान संघाने 12 सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राजस्थान आणि बंगळुरु आमने-सामने

आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या दोन संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. 16 व्या हंगामातील 32 वा सामना आज, 23 एप्रिलला बंगळुरुच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर (M. Chinnaswamy Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. 

हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये आरसीबीची कामगिरी -  

हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये आरसीबीची कामगिरी -  



  • आयपीएल 2011 - विजय

  • आयपीएल 2012 - पराभव

  • आयपीएल 2013 - पराभव

  • आयपीएल 2014 - पराभव

  • आयपीएल 2015 - निकाल नाही

  • आयपीएल 2016 - विजय

  • आयपीएल 2017 - पराभव

  • आयपीएल 2018 - पराभव

  • आयपीएल 2019 - पराभव

  • आयपीएल 2020 - पराभव

  • आयपीएल 2021 - निळ्या रंगाची जर्सी (पराभव)

हिरव्या रंगाची जर्सी RCB संघासाठी अनलकी?

प्रत्येकवर्षी एका सामन्यासाठी आरसीबी ही जर्सी घालून मैदानात उतरते. आयपीएलच्या चौथ्या हंगामात आरसीबीचा कोच्ची टस्कर्सविरुद्ध पहिल्यांदा हिरव्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरला होता. 2021 मध्ये आरसीबीच्या या परंपरेला खंड पडला होता. कारण, कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आरसीबीचा संघ निळ्या जर्सीमध्ये मैदानात उतरला होता.  आरसीबीचा संघ प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला एक झाडही भेट म्हणून देतो. दरम्यान, ग्रीन जर्सीमध्ये त्यांना पराभवाचाच सामना जास्त करावा लागत आहे. ग्रीन जर्सी आरसीबीसीठी अनलकी असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं. 

हिरव्या रंगाची जर्सी घालण्याचं कारण काय?

 


आरसीबी 23 एप्रिल रोजी एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर ग्रीन जर्सी परिधान करुन मैदानात उतरणार आहे. दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ एका सामन्यात ही हिरवी जर्सी परिधान करतात. यंदाही आरसीबी ही परंपरा कायम राखणार आहे. 

हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आरसीबी

 


सोशल मीडियावर आरसीबीच्या ग्रीन जर्सीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या ग्रीन जर्सीमध्ये विराट कोहली, फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक दिसत आहेत. आरसीबीची ग्रीन जर्सी सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडल्याचं दिसून येत आहे.  

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 32, RCB vs RR : आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या दोन संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. 16 व्या हंगामातील 32 वा सामना आज, 23 एप्रिलला बंगळुरुच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर (M. Chinnaswamy Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. 


RR vs RCB IPL 2023 : बंगळुरु की राजस्थान कोण ठरणार वरचढ?
इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 32 व्या सामन्यात आज रविवारी, 23 एप्रिल रोजी राजस्थान आणि बंगळुरु (RCB vs RR) यांच्यातील सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium) होणार आहे. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वात आरसीबी संघ पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे तर, संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात राजस्थान रॉयल्स पहिल्या क्रमांकावर कायम आहे. राजस्थान संघालाल मागील सामन्यात लखनौकडून पराभवाचा सामना करावा लागला. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पंजाब किंग्सवर विजय मिळवल्यानंतर आज चेन्नई विरुद्ध मैदानात उतरणार आहे. 


RCB vs RR Head To Head : हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई (MI) आणि पंजाब (PBKS) या संघांमध्ये आतापर्यंत 28 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये बंगळुरु संघाचं पारड किंचित जड दिसून आलं आहे. आरसीबी संघाने 28 पैकी 13 सामने जिंकले आहेत, तर राजस्थान संघाने 12 सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


M. Chinnaswamy Stadium Pitch Report : चिन्नास्वामी स्टेडियम खेळपट्टीचा अहवाल
बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. येथे गोलंदाजांना खास कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरूमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा करूनच फलंदाजांवर दबाव आणता येतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा होईल.


RR vs RCB IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि राजस्थान (Rajasthan Royals) या दोन संघामध्ये 23 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना बंगळुरुमील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता रंगणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.