IPL 2024 Playoffs : दोन महिन्यानंतर आणि 70 सामन्यानंतर आयपीएल 2024 मधील टॉप 4 संघ निश्चित झालेत. कोलकाता, सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या चार संघांनी प्लेऑपमध्ये प्रवेश केलाय. क्वालिफायर 1 मध्ये कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. तर 22 मे रोजी आरसीबीचा संघ एलिमेनटरमध्ये राजस्थान रॉयल्ससोबत भिडणार आहे. आरसीबीने 18 मे रोजी करो या मरो सामन्यात चेन्नईचा 27 धावांनी पराभव करत प्लेऑफचं तिकिट मिळवले. 


22 मे 2024 रोजी आरसीबी आणि राजस्थान यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल सामना होणार आहे.  पण एलिमेनटरमध्ये फसण्याची आरसीबीची पहिली वेळ नाही. याआधी आरसीबीने एलिमेनटरचे तीन सामने खेळले आहेत, त्यामध्ये त्यांना फक्त एका सामन्यात विजय मिळवता आलाय. म्हणजे, एलिमेनटरचा अडथळा पार करताना आरसीबीला दुप्पट मेहनत घ्यावी लागणार आहे. 


आरसीबीने कधी कधी खेळलाय एलिमेनटरचा सामना - 


आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासात आरसीबीने तीन वेळा फायनलपर्यंत मजल मारली, पण त्यांना एकदाही चषक उंचावता आला नाही. 2009, 2011 आणि 2016 मध्ये आरसीबीनं फायनल खेळली होती. पण 2020 मध्ये आरसीबीने पहिल्यांदा एलिमेटनरचा सामना खेळला. लो स्कोअरिंग सामन्यात हैदराबादने आरसीबीचा 4 विकेटने पराभव केला होता. हैदराबादने तेव्हा आरसीबीला स्पर्धेबाहेर काढले होते. 


आयपीएल 2021 मध्येही आरसीबीने एलिमेनटरपर्यंत धडक मारली. यावेळी आरसीबीसमोर दोन वेळच्या विजेत्या कोलकात्याचं आव्हान होतं. पण त्यांना हा अडथळा पार करता आला नाही. कोलकात्याने आरसीबीचा चार विकेटने पराभव केला होता. 


2022 मध्ये, RCB सलग तिसऱ्यांदा एलिमिनेटर सामना खेळला . यावेळी त्याचा सामना लखनौ सुपर जायंट्ससोबत झाला. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौचा 14 धावांनी पराभव करून क्वालिफायर 2 मध्ये स्थान मिळवले. पण क्वालिफायर 2 च्या सामन्यात आरसीबीला राजस्थानविरुद्ध 7 विकेटने पराभव स्वीकारावा लागला. आरसीबीने आतापर्यंत तीन वेळा  एलिमिनेटर सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त एकदाच जिंकले आहे. यंदा आरसीबीसमोर राजस्थानचे तगडे आव्हान असेल. आरसीबी एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 चा अडथळा पार करत फायनलमध्ये धडक मारणार का?