RCB Vs KKR LIVE Score Updates, IPL 2024: केकेआरने आरसीबीचा केला पराभव; कोहलीची खेळी ठरली व्यर्थ

Royal Challengers Bengaluru Vs Kolkata Knight Riders LIVE Score Updates, IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 7 गडी राखून पराभव केला आहे.

युवराज जाधव Last Updated: 29 Mar 2024 10:55 PM
कोलकाता नाईट रायडर्सचा 7 विकेट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर विजय

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या हंगामातील दहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सने 7 विकेट्सने आरसीबीवर विजय मिळवला.





व्यंकटेश अय्यर बाद

केकेआरने 16व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 167 धावांवर तिसरी विकेट गमावली आहे. व्यंकटेश अय्यर 30 चेंडूत 50 धावा करून बाद झाला. मात्र, केकेआरला विजयासाठी आणखी फक्त 16 धावा करायच्या आहेत.

व्यंकटेश अय्यरचे झंझावाती अर्धशतक

व्यंकटेश अय्यरने अवघ्या 29 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. आतापर्यंत त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले आहेत. तर श्रेयस अय्यर 19 चेंडूत 26 धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये 75 धावांची भागीदारी झाली आहे. 15 षटकात केकेआरची धावसंख्या 2 विकेटवर 167 धावा आहे.





सामना कोलकाताच्या ताब्यात

या सामन्यात केकेआरचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. कोलकाताची धावसंख्या अवघ्या 14 षटकांत 2 विकेटच्या मोबदल्यात 150 धावांपर्यंत पोहोचली आहे. KKR ला आता 36 चेंडूत फक्त 33 धावा करायच्या आहेत. व्यंकटेश अय्यर 25 चेंडूत 42 धावांवर खेळत आहे. आतापर्यंत त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. श्रेयस अय्यर 17 चेंडूत 19 धावांवर खेळत आहे.

कोलकाताची धावसंख्या 137-2

12 षटकांनंतर कोलकाता नाईट रायडर्सची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 137 धावा झाल्या आहेत. केकेआरला आता 48 चेंडूत फक्त 46 धावा करायच्या आहेत. व्यंकटेश अय्यर 18 चेंडूत 34 तर श्रेयस अय्यर 12 चेंडूत 14 धावांवर खेळत आहे. व्यंकटेश तुफानी फलंदाजी करत आहे.

जोसेफच्या षटकात व्यंकटेश अय्यरने चोपल्या 20

अल्झारी जोसेफने 11वे षटक टाकले. व्यंकटेश अय्यरने या षटकात दोन चौकार आणि दोन षटकार मारले. 11 षटकांनंतर केकेआरची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 132 धावा आहे. व्यंकटेश 15 चेंडूत 32 धावांवर तर श्रेयस अय्यर 9 चेंडूत 11 धावांवर खेळत आहे.

सॉल्टही माघारी, केकेआरला दुसरा धक्का

केकेआरला 8व्या षटकात 92 धावांवर दुसरा धक्का बसला. इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या विजय कुमार वैशाखने आरसीबीला दुसरे यश मिळवून दिले. 20 चेंडूत 30 धावा करून सॉल्ट बाद झाला.

केकेआरची पहिली विकेट पडली

मयंक डागरने सातव्या षटकात केकेआरला पहिला धक्का दिला. मयंकने सुनील नारायणच्या गोलंदाजीवर फटका मारला. नारायण 22 चेंडूत 47 धावा करून बाद झाला. नारायणने 2 चौकार आणि 5 षटकार लगावले.





पाच षटकांनंतर केकेआर संघाची धावसंख्या 63/0

पाच षटकांचा खेळ पूर्ण झाला. कोलकाताने बिनबाद 63 धावा केल्या आहेत. सुनील नरेन आणि फिलिप सॉल्ट यांच्यात चांगली भागीदारी पाहायला मिळत आहे.

कोलकाताच्या फलंदाजीला सुरुवात; सॉल्ट अन् नारायणचा आक्रमक पवित्रा, 6 चेंडूत 18 धावा

कोलकाताच्या फलंदाजीला सुरुवात झाली असून कोलकाताचे सलामीवीर फलंदाज नारायण आणि सॉल्टने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. मोहम्मद सिराजच्या पहिल्या षटकांत 18 धावा केकेआरच्या फलंदाजांनी केल्या.

कोलकाता नाइट रायडर्सला विजयासाठी 183 धावांचं आव्हान

आरसीबीने कोलकाताला 183 धावांचे लक्ष्य दिले आहे. विराट कोहलीने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. कोहलीने 59 चेंडूत 83 धावा केल्या.





आरसीबीची पाचवी विकेट पडली; अनुज रावत बाद

हर्षित राणाने 18व्या षटकात अनुज रावतला बाद केले. आरसीबीने 151 धावांवर पाचवी विकेट गमावली आहे. रावतला केवळ तीन धावा करता आल्या. केकेआरने अप्रतिम पुनरागमन केले आहे. या षटकात राणाने केवळ पाच धावा दिल्या.

15 षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या 134/3

15 षटकांचा खेळ पूर्ण झाला. विराट कोहली 62 धावांवर आणि रजत पाटीदार एका धावेवर नाबाद खेळत आहे. ग्लेन मॅक्सवेल 28 धावा करून बाद झाला. 15 षटकांनंतर संघाची धावसंख्या 134/3 आहे.

विराट कोहलीचे अर्धशतक

विराट कोहलीने अर्धशतक झळकावले आहे. 36 चेंडूत कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले.

आरसीबीचे दोन गडी बाद

आरसीबीचे दोन गडी बाद झाले आहेत. आद्रे रसेलने ग्रीनला त्रिफळाचीत केले. ग्रीनने 21 चेंडूत 33 धावा केल्या. सध्या 10 षटकांत आरसीबीची धावसंख्या 85 वर पोहचली आहे.

आरसीबीची 6 षटकांत 61/1 धावसंख्या

आरसीबीने 6 षटकांत एक विकेट गमावत 61 धावा केल्या आहेत. सध्या विराट कोहलीने 18 चेंडूत 28 धावा केल्या आहेत, तर ग्रीनने 12 चेंडूत 24 धावा केल्या आहे. कोहली आणि ग्रीनकडून तुफान फटकेबाजी पाहायला मिळत आहे.





कोहलीकडून स्टार्कची धुलाई

तिसऱ्या षटकात विराट कोहलीने मिचेल स्टार्कची धुलाई केली. कोहलीने स्टार्कवर एक षटकार आणि एक चौकार मारला. या षटकात एकूण 17 धावा आल्या. 3 षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या एका विकेटवर 38 धावा आहे. किंग कोहली 15 चेंडूत 26 तर कॅमेरून ग्रीन एका चेंडूत 4 धावांवर खेळत आहे.





आरसीबीला पहिला धक्का; फाफ डू प्लेसिस बाद

आरसीबीची पहिली विकेट गेली आहे. संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस 8 धावा करत बाद झाला आहे. केकेआरचा वेगवान गोलंदाज हर्षित राणेने त्याला झेलबाद केले.

सुनील नारायणच्या नावावर मोठा विक्रम

कोलकाताचा फिरकीपटू गोलंदाज सुनील नारायण मैदानात उतरताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. नारायण आज आरसीबीविरुद्ध टी-20 कारकिर्दीतील 500 वा सामना खेळणार आहे. याआधी पोलार्डने 660 सामने खेळले आहेत. ड्वेन ब्राव्होने 573 सामने खेळले आहेत तर शोएब मलिक 542 सामने खेळून या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.





कोलकाता नाइट रायडर्स Playing XI

फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू Playing XI

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (w), दिनेश कार्तिक, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

कोलकाताचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले आहे.





आरसीबीला कोहलीकडून आशा

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहलीकडून त्याच्या संघाला पुन्हा एकदा आशा असतील. आरसीबीचा माजी कर्णधार कोहलीने गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते, त्याच्या जोरावर संघ लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरला. कोहलीतही भागीदारी उभारण्याची क्षमता आहे. त्याने आयपीएलमध्ये सात वेळा 150 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी केली आहे. कोहली आणि कर्णधार फाफ डुप्लेसिसची जोडीही आयपीएलमध्ये धमाकेदार असून केकेआरच्या गोलंदाजांसमोर आरसीबीच्या या सलामीच्या जोडीला रोखण्याचे आव्हान असेल.

सरावात ग्लेन मॅक्सवेलची तुफान फटकेबाजी

चेन्नई अन् राजस्थानमध्ये नंबर 1 साठी लढाई

पाहा परफेक्ट 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल

एम. चिन्नास्वामी मैदान सज्ज

गेल्या पाच मॅचमध्ये कोण जिंकलं, बंगळुरु की कोलकाता

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील गेल्या पाच मॅचमध्ये केकेआरनं बाजी मारली आहे. 

सुनील नरेन 500 वी टी-20 मॅच खेळणार, अशी कामगिरी करणारा पहिला स्पिनर

सुनील नरेन 500 वी टी-20 मॅच खेळणार, अशी कामगिरी करणारा पहिला स्पिनर





RCB vs KKR : आरसीबी की केकेआर आज कोण जिंकणार? गुगलचं प्रेडिक्शन काय?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील मॅचमध्ये आज आरसीबी विजयी होऊ शकते , असा अंदाज गुगल प्रेडिकशननं केला आहे.

RCB vs KKR :आरसीबी आणि कोलकाता मॅच किती वाजता सुरु होणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील मॅच  आज  सायंकाळी साडे सात वाजता सुरु होणार आहे. स्टार स्पोर्टस आणि जिओ सिनेमावर मॅच पाहता येईल.

RCB vs KKR : आरसीबी आणि केकेआर आतापर्यंत किती वेळा आमने सामने, कोण वरचढ ठरलं?

आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलमध्ये 32 वेळा आमने सामने आले आहेत. कोलकाताच्या  टीमनं 18 वेळा विजय मिळवला तर केकेआरनं 14 वेळा मॅच जिंकली.

कोलकाताच्या फलंदाजांना रोखण्याचं आरसीबीसमोर आव्हान 

कोलकाता आणि आरसीबी यांच्यातील लढत आज होणार आहे. कोलकात्याच्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान आरसीबीसमोर असेल.

पार्श्वभूमी

RCB Vs KKR LIVE Score Updates, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 10 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 7 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम खेळून विराट कोहलीच्या नाबाद 83 धावांच्या खेळीमुळे आरसीबीने 20 षटकांत 182 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केकेआरने 16.5 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला. केकेआरसाठी फिल सॉल्टने 20 चेंडूत 30 धावा, सुनील नरेनने 22 चेंडूत 47 धावा, व्यंकटेश अय्यरने 30 चेंडूत 50 धावा आणि श्रेयस अय्यरने 24 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. यासह घरच्या संघाची विजयी मालिकाही खंडित झाली आहे. केकेआरने बेंगळुरूमध्येही आपला मजबूत विक्रम कायम राखला.





- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.