RCB vs GT Playing 11 & Pitch Report : आज आयपीएलमधील (IPL 2023) शेवटच्या साखळी सामन्यात बंगळुरु आणि गुजरात संघ आमने-सामने येणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) रविवारी, 21 मे रोजी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या 70 व्या सामन्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात टायटन्स (GT) विरोधात उतरणार आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दणदणीत विजय नोंदवत रॉयल चॅलेंजर्स आजच्या सामन्यात उतरणार आहे. कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वात (Faf du Plessis) आरसीबी संघ गतविजेत्या गुजरात विरुद्धची आजची लढत जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल.


गुजरात आणि बंगळुरु आमने-सामने


दुसरीकडे, गुजरात टायटन्स हा आयपीएल 2023 मधील सर्वात वरचढ संघ आहे. संघ गुणतालिकेत सुरुवातीपासूनच टॉप 4 मध्ये असून प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ आहे. गुजरात संघाने 13 पैकी नऊ सामने जिंकले आहेत. 18 गुणांसह गुजरात पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहेत. त्‍यांच्‍या मागील गेममध्‍ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात हैदराबादचा पराभव करत पहिल्या क्वालिफायर सामन्याचं तिकीट मिळवलं. ते विजयी गतीवर स्वार होऊन रविवारी बंगळुरू संघावर विजय मिळवतील.




M. Chinnaswamy Stadium Pitch Report : चिन्नास्वामी स्टेडियम खेळपट्टीचा अहवाल


आज संध्याकाळी 7.30 वाजता बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. येथे गोलंदाजांना खास कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरूमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा करूनच फलंदाजांवर दबाव आणता येतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा होईल.


RCB vs GT Probable Playing 11 : दोन्ही संघांची प्लेईंग 11


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) :


विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, हर्षल पटेल, वेन पारनेल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज.


गुजरात टायटन्स (GT) :


शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुधारसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, दासून शनाका, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : RCB संघाला मोठा झटका! 'हा' स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर; गुजरात विरुद्ध सामन्याआधी अडचणी वाढल्या