KL Rahul In IPL 2023 : लखनौचा कर्णधार केएल राहुल याने आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले. आधीच्या काही सामन्यात राहुलची बॅट शांत दिसत होती. पण पंजाबविरोधात राहुल याने संयमी फलंदाजी केली. या अर्धशतकासह राहुलने आयपीएलमध्ये चार हजार धावांचा पल्ला पार केला आहे. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चार हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम राहुलच्या नावावर जमा झालाय. याआधी हा विक्रम युनिवर्स बॉस ख्रिस गेल याच्या नावावर होता. 


गेलचा विक्रम मोडला -


केएल राहुल याने पंजाबविरोधात दमदार अर्धशतकी खेळी करत आयपीएलमध्ये चार हजार धावांचा पल्ला पार केला. राहुल याने 105 डावात चार हजार धावांचा पल्ला पार केला. यासह राहुल याने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चार हजार धावांचा पल्ला पार करण्याचा विक्रम केलाय. राहुलने युनिवर्स बॉस केएल राहुल याचा विक्रम मोडीत काढलाय. ख्रिस गेल याने ११२ डावात चार हजार धावा करण्याचा विक्रम केला होता. पण आज राहुलने हा विक्रम मोडला. राहुल याने अवघ्या १०५ डावात चार हजार धावा केल्या आहेत.  


यंदाच्या हंगामात शांत होती राहुलची बॅट - 


पंजाबविरोधातील अर्धशतकापूर्वी राहुलची बॅट शांत होती. राहुलला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता येत नव्हती.  दिल्लीविरोदात   8, चेन्नईविरोधात 20, हैदराबादविरोधात 35 आणि आरसीबीविरोधात 18 धावांची खेळी करता आली होती. आज राहुलने 74 धावांची खेळी केली. 


राहुलचे आज संयमी अर्धशतक -


एकीकडे लखनौचे फलंदाजांनी ठरावीक अंताराने विकेट फेकत असतानाच दुसरीकडे केएल राहुल याने संयमी फलंदाजी केली. केएल राहुल पहिल्या चेंडूपासूनच धावसंख्या हालती ठेवत फलंदाजी करत होता. दुसऱ्या बाजूला सातत्याने विकेट पडत असल्यामुळे राहुल याचा स्ट्राईक रेटही घसरला होता. राहुल याने अखेरच्या षटकात फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. पण अर्शदीप याने राहल याला बाद केले. राहुल याने 56 चेंडूत 74 धावांची खेळी केली. या खेळीत राहुलने एक षटकार आणि आठ चौकार लगावले.


गेल्या हंगामात धावांचा पाऊस - 
आयपीएलच्या गेल्या हंगमात राहुल याने धावांचा पाऊस पाडला होता. राहुलने 15 सामन्यात 52 च्या सरासरीने आणि 135.38 च्या स्ट्राइक रेटने 616 धावा केल्या हत्या. यादरम्यान दोन शतके आणि चार अर्धशतके झळकावली होती.  


आयपीएलमध्ये राहुलची कामगिरी कशी ?


केएल राहुल याने आयपीएलमध्ये चार हजार धावांचा पल्ला पार केला आहे. राहुलने 105 डावात चार हजार धावांचा पल्ला पार केलाय. यामध्ये चार शतके आणि  32 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये राहुलची सर्वोच्च धावसंख्या 132 इतकी आहे.