Atharva Taide IPL 2023 : आज पंजाबकडून खेळणारा अथर्व तायडे हा मूळचा अकोल्याचा आहे. पंजाबचा कर्णधार शिखर धवन याच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे तो लखनौविरोधात खेळत नाही. त्याच्याजाही पंजाबकडून अथर्व याला संधी देण्यात आली आहे. अथर्व तायडे हा सुद्धा सलामी फलंदाज आहे. त्याशिवाय तो गोलंदाजीही करतो. अथर्वचे वडील अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात प्राध्यापक आहेत. तर आई देवयानी या गृहिणी आहेत. तायडे हे कुटूंब अकोल्याच्या शास्त्री नगर परिसरात राहते. अथर्वच्या निवडीचा त्याच्या कुटूंबियांसह प्रशिक्षकांनाही आनंद झाला आहे. अथर्व याने आपल्या क्रिकेटने सर्वांचेच लक्ष वेधलेय. 


ना अत्याधुनिक सुविधा, ना राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट ग्राऊंड...तरीही अकोल्याच्या अथर्व तायडे यांने आयपीएलमध्ये पदार्पण केलेय. डावखुरा फलंदाज अथर्व तायडे आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. वयाच्या आठव्या वर्षापासून अकोला क्रिकेट क्लबवर खेळणाऱ्या अथर्वने यापूर्वी 16, 19, 23 वर्षाखालील विदर्भ व मध्य विभाग क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो 19 व 23 वर्षाखालील भारतीय संघाकडूनही खेळला आहे. विदर्भ रणजी विजेत्या संघाकडून इराणी टॉफीतही सहभागी झाला होता. त्याशिवय लँकेशायर संघामध्येही तो खेळलाय. पंजाब किंग्सने अथर्व तायडे याला 20 लाख रुपयांत आपल्या ताफ्यात घेतले होते. 


अथर्व तायडेची आतापर्यंतची कामगिरी
1) 2018-19 च्या हंगामात कुचबिहार ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 19 वर्षाखालील संघात 320 धावांची सर्वोच्च खेळी केली होती. 
2) अथर्वच्या नेतृत्वात 2014 मध्ये 14 वर्षाखालील संघानं राजसिंग डूंगरपूर सिरीज जिंकली होती. या स्पर्धेत अथर्वने मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकला होता.  
3) 2017-18 मध्ये आशिया कप चषकमध्ये 19 वर्षाखालील भारतीय संघात सहभाग. 
4) 2017-18 मध्ये 19 वर्षाखालील भारतीय संघ श्रीलंकेच्या दौर्यावर गेला होता. यात अथर्वनं सलग दोन शतकं लगावली होती. 
 5) कौंटी क्रिकेटमध्ये लँकेशायर संघाशी करारबद्ध आहे. या सिरीजमध्ये 16 सामन्यात 1100 धावा. 61 बळी घेतलेत.






शिखर धवनला दुखापत, अथर्व तायडेला संधी - 


LSG vs PBKS, IPL 2023 : पंजाब किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे . पंजाबकडून आज सॅम करन नेतृत्व करत आहे. शिखर धवन दुखापतग्रस्त असल्यामुळे आज तो मैदानात उतरणार नाही.  शिखर धवन यंदा भन्नाट फॉर्मात आहे. दुखापतग्रस्त झाल्यामुळे पंजाबला मोठा धक्का बसलाय. तर दुसरीकडे लखनौकडून आज युधवीर सिंह पदार्पण करत आहे. नाणेफेक गमावल्यानंतर केएल राहुलचा लखनौ संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. दोन्ही संघात काही बदल करण्यात आले आहेत. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन...


लखनौची प्लेईंग इलेव्हन : केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिस, क्रुणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, अवेश खान, युद्धवीर सिंह चरक, मार्क वूड, रवि बिश्नोई


पंजाब किंग्सच्या संघात कोण कोण :
 अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंह भाटिया, सिकंदर रजा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, सॅम करन (कर्णधार), हरप्रीत ब्रार, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह