Rcb Playoffs Scenario Marathi : आयपीएलचा 17 वा हंगाम आरसीबीसाठी आतापर्यंत अतिशय खराब राहिलाय. नऊ सामन्यात आरसीबीला फक्त दोन सामन्यात विजय मिळवता आलाय. पण आरसीबीच्या प्लेऑफच्या आशा अद्याप जिवंत आहेत. गुरुवारी हैदराबादचा पराभव करत आरसीबीनं प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवलं. पण प्लेऑफचं समीकरण आरसीबीसाठी सोपं नाही. पण आरसीबीच्या एका चाहत्यानं प्लेऑफचा रोडमॅप तयार केलाय. दोन तास रिसर्च करुन त्यानं आरसीबी प्लेऑफमध्ये कसं पोहचणार.. याची ब्लू प्रिंट तयार केली आहे. सोशल मीडियावर हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
आरसीबीनं नऊ सामन्यात दोन विजय मिळवले आहेत. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आरसीबीला उर्वरित पाचही सामन्यात मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागणार आहे. सर्व सामने जिंकल्यास आरसीबीचं प्लेऑफमधील आव्हान जिवंत राहणार आहे. त्याशिवाय आरसीबीला इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून राहावं लागणार आहे. आरसीबीच्या एका जबऱ्या चाहत्यानं प्लेऑफचा रोडमॅप तयार केलाय, त्याशिवाय त्यानं गुणतालिकाही तयार केली आहे. पाहूयात.. त्यानं नेमकं काय डोकं लावलेय.
आरसीबीचा जबरा फॅन -
आरसीबीच्या एका चाहत्यानं प्लेऑफचा रोडमॅप तयार केलाय. अंतिम चार संघाची नावेही त्यानं फायनल केली आहेत. यासाठी त्यानं दोन तासांचा रिसर्च केला आहे. आयपीएलच्या 38 व्या सामन्यापासून ते 69 व्या सामन्यापर्यंतचा अंदाज त्यानं व्यक्त केला आहे. आरसीबीकडे आता फक्त चार गुण आहेत. त्याचं प्लेऑफचं आव्हान जिवंत आहे, पण अशक्यप्राय दिसत आहे. क्रिकेटमध्ये कोणताही गोष्ट अशक्य नसते, त्यामुळे आरसीबीच्या चाहत्यांना अजूनही प्लेऑफच्या आशा आहेत. आरसीबीने उर्वरित पाचही सामन्यात विजय मिळवला तर 14 गुणांपर्यंत मजल मारु शकते.
गुणतालिकाही तयार -
आयुष नावाच्या एका आरसीबीच्या चाहत्यानं आरसीबी प्लेऑफमध्ये कसं पोहचणार.. याचं गणित मांडलेय. त्याशिवाय त्यानं गुणतालिकाही तयार केली आहे. गुणतालिकेत राजस्थान रॉयल 20 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर सनरायजर्स हैदराबादही 20 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानपेक्षा हैदराबादचा रनरेट कमी दाखवण्यात आलाय. कोलकाता नाईट रायडर्स 16 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं दाखवलेय. तर आरसीबीचा संघ 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहू शकतो, असा अंदाज वर्तवलाय. CSK, GT, LSG, MI, PBKS आणि DC यांचं प्लेऑफचं स्वप्न भंगणार असल्याचा अंदाज वर्तवलाय.