Rajasthan Royals jersey : आयपीएलचा आगामी हंगाम अर्थात 16 वा सीझन आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 31 मार्चपासून सुरु होणाऱ्या या सामन्यासाठी सर्व संघ सज्ज होत असून काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सनं नवी-कोरी जर्सी समोर आणली. ज्यानंतर आता राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) संघानंही नवी जर्सी समोर आणली आहे. ही जर्सी मागील वर्षीच्या कलर्समध्येच असली तरी त्यात काही खास गोष्टी आहेत. जसंकी जर्सीची डिझाईन ही राजस्थानची स्थानिक कल्चर सादर करणारी असून राजस्थानच्या पेजनं याबाबत खास पोस्टही केली आहे.
पाहा नवी जर्सी-
ट्रेनिंग जर्सी-
राजस्थान रॉयल्स त्यांच्या आयपीएल 2023 मोहिमेला 2 एप्रिल रोजी हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्याने सुरुवात करणार आहेत. दुपारी 3.30 वाजता हा सामना सुरू होईल. तर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 19 एप्रिल रोजी सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर येथे आरआर त्यांचा पहिला होम सामना खेळणार आहे. गेल्या वर्षीच्या फायनलमध्ये रॉयल्सला गुजरात टायटन्सकडून सात गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. राजस्थान रॉयल्सने सोमवारी आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2023 हंगामासाठी संपूर्ण प्रशिक्षक कर्मचारी यांची नाव देखील जाहीर केली. राजस्थानच्या संघाकडे कुमार संगकारा (क्रिकेट संचालक आणि मुख्य प्रशिक्षक), ट्रेव्हर पेनी (सहाय्यक प्रशिक्षक), लसिथ मलिंगा (वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक), झुबिन भरुचा (रणनीती, विकास आणि कामगिरी संचालक), गाइल्स लिंडसे हेच संबधित पदांवर असणार आहेत. तसंच सिद्धार्थ लाहिरी (सपोर्ट कोच) आणि दिशांत याज्ञिक (फिल्डिंग कोच) असणार आहेत. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघाने जॉन ग्लोस्टर (हेड फिजिओ), डॉ रॉब यंग (टीम डॉक्टर) आणि एटी राजमणी प्रभू (स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच) यांच्या सेवाही कायम ठेवल्या आहेत. IPL 2022 च्या अंतिम फेरीतील खेळाडूंनी त्यांचे मानसिक कार्यप्रदर्शन प्रशिक्षक म्हणून Mon Brokman आणि सहाय्यक फिजिओ म्हणून नील बॅरी यांना ऑन-बोर्ड केलं आहे.
यंदा रिटेन केलेले खेळाडू – संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, प्रसिध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, ओबेद मॅककॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युजवेंद्र चहल , केसी करिअप्पा.
नव्याने लिलावात विकत घेतलेले खेळाडू - आकाश वशिष्ठ (20 लाख), मुरुगन अश्विन (20 लाख), केएम आसिफ (30 लाख), एडम जॅम्पा (1.5 कोटी), कुनाल सिंह राठौर (20 लाख), डोनावोन फेरेरा (50 लाख), जेसन होल्डर (5.75 कोटी), जो रूट (1 कोटी), अब्दुल बासित (20 लाख).
हे देखील वाचा-