Rajasthan Royals Playoff : संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सनं यंदाच्या हंगामात आठव्या विजयाची नोंद केली आहे. 16 गुणांमुळे राजस्थानचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित झालं आहे. यंदाच्या हंगामात प्लेऑफमध्ये पात्र होणारा राजस्थान पहिला संघ ठरला आहे. राजस्थान रॉयल्सनं नऊ सामन्यात आठ विजय मिळवले आहेत. राजस्थानचा फक्त एका सामन्यात पराभव झाला आहे. राजस्थानच्या नावावर 9 सामन्यात 16 गुण झाले आहेत.
राजस्थानचे यंदाच्या हंगामातील नऊ सामने -
24 मार्च 2024 -
राजस्ताननं लखनौचा 20 धावांनी पराभव करत यंदाच्या हंगामाची दणक्यात सुरुवात केली. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना चार विकेटच्या मोबदल्यात 193 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल लखनौला 173 धावांत रोखलं.
28 मार्च 2024 -
राजस्थाननं दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव केला. अटीतटीच्या सामन्यात राजस्थानने बाजी मारली. राजस्थानने प्रथम फलंदाजी कराताना 185 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल दिल्लीला 173 धावात रोखलं.
1 एप्रिल 2024
मुंबईचा पराभव करत राजस्थान रॉयल्सनं सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 125 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल राजस्थानने सहा विकेट राखून हे आव्हान पार केले.
6 एप्रिल 2024 -
संजू सॅमसनच्या राजस्थाननं आरसीबीचा रॉयल पराभव केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 183 धावा केल्या, हे आव्हान राजस्थानने सहज पार केले. राजस्थान रॉयल्सने सहा विकेटने हा सामना जिंकला.
10 एप्रिल 2024 -
गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा विजयरथ रोखला. राजस्थानचा पराभव फक्त गुजरातनं केला. अटीतटीच्या सामन्यात गुजरातनं तीन विकेटने विजय मिळवला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 196 धावा केल्या. गुजरातने हे आव्हान तीन विकेट राखून पार केले.
13 एप्रिल 2024 -
राजस्थाननं पंजाब किंग्सचा तीन विकेटने पराभव केला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 147 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल राजस्थानने हे आव्हान सात विकेटच्या मोबदल्यात पार केले.
16 एप्रिल 2024 -
गुजरातनं कोलकात्याला घरात जाऊन हरवलं. घरच्या मैदानावर कोलकात्यानं 223 धावांचा डोंगर उभारला होता. राजस्थाननं हे आव्हान शेवटच्या चेंडूवर पार केले. आयपीएलमधील हा सर्वात यशस्वी पाठलागापैकी एक होय.
22 एप्रिल 2024 -
राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सचा 9 विकेटनं सहज पराभव केला. राजस्थान रॉयल्सनं मुंबईने दिलेल्या 180 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला.
27 एप्रिल 2024 -
आज राजस्थान रॉयल्सनं लखनौचा सात विकेटनं पराभव केला. लखनौनं प्रथम फलंदाजी करताना 196 धावांचा डोंगर उभारला होता. हे आव्हान राजस्थानने सात विकेट राखून पार केले.
राजस्थान रॉयल्सनं धावांचा पाठलाग करताना यंदाच्या हंगामात शानदार कामगिरी केली. राजस्थाननं पहिल्या दोन सामन्यात फक्त प्रथम फलंदाजी करताना विजय मिळवला. तर गुजरातनं राजस्थानविरोधात धावांचा यशस्वी पाठलाग केला. म्हणजे, राजस्थान रॉयल्सनं आतापर्यंत सहा सामन्यात धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.