IPL Qualifier : क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानने आरसीबीचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. तब्बल 14 वर्षानंतर राजस्थान संघाने आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली. शुक्रवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये राजस्थानने आरसीबीचा पराभव करत फायनलमध्ये एन्ट्री मारली. या विजयानंतर राजस्थानच्या खेळाडूंचा आनंद गगणात मावत नव्हता.. 


स्टेडिअममध्ये राजस्थानच्या चाहत्यांनी जल्लोष केलाच. सामन्यानंतर हॉटेलमध्ये राजस्थानच्या खेळाडूचं दणक्यात स्वागत करण्यात आले. राजस्थानच्या खेळाडूंनी सामन्यानंतर विजयाचं सेलिब्रेशन केले..











राजस्थान रॉयल्सने तब्बल 14 वर्षानंतर फायनलमध्ये धडक मारली आहे. याआधी राजस्थानने 2008 मध्ये फायनलमध्ये धडक मारली होती. शेन वॉर्नच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सने आयपीएलचं विजेतेपद पटकावले होते. आता तब्बल 14 वर्षानंतर पुन्हा राजस्थानने फायनलमध्ये धडक मारली आहे. शुक्रवारी क्वालिफायर 2 मध्ये आरसीबीचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. विजयानंतर राजस्थानच्या खेळाडूंनी जंगी सेलिब्रेशन केले.  






29 मे, रविवारी राजस्थान रॉयल्सपुढे गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे. हार्दिक पांड्या नेतृत्वातील गुजरातने पदार्पणाच्या आयपीएल हंगमात दमदार कामगिरी केली. अहमदबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये राजस्थान आणि गुजरात यांच्यामध्ये सामना होणार आहे. रविवारी रात्री साडेसात वाजाता नाणेफेक होणार आहे. तर आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 


 














महत्वाच्या बातम्या: