Rahul Tripathi : मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्यासमोर हैदराबादची फलंदाजी ढेपाळली. अख्या आयपीएलमध्ये अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांनी प्रतिस्पर्धी संघाची भंबेरी उडवली होती. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला होता. पण कोलकात्याविरोधात प्लेऑफच्या सामन्यात स्टार्कने भेदक मारा करत हैदराबादची दाणादाण उडवली. पण मराठमोळ्या राहुल त्रिपाठीने एकट्याने झुंज दिली. राहुल त्रिपाठी याने शानदार अर्धशतक ठोकत हैदराबादच्या डावाला आकार दिला. पण मोक्याच्या क्षणी तो धावबाद झाला. अब्दुल समद आणि राहुल त्रिपाठी यांच्यामध्ये धाव घेण्यावरुन गोंधळ झाला. त्यात राहुल त्रिपाठी धावबाद झाला. त्यानंतर राहुल त्रिपाठी याला अश्रू अनावर आले. त्याला स्वत: अश्रूला रोखता आले नाही. याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


नेमकं झालं काय ?


कोलकात्याकडून सुनील नारायण 14 वे षटक घेऊन आला. अब्दुल समद याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. दुसऱ्या चेंडूवरही त्याने ऑफसाईडला जोरदार फटका मारला. आंद्रे रसेल याने आऊठसाईड ऑफवरील चेंडू अडवला, अन् गुरबाजकडे फेकला. पण या कालावधीमध्ये अब्दुल समद आणि राहुल त्रिपाठी हो नाही हो नाही... म्हणत धावले.. पण तोपर्यंत चेंडू विकेटकीपरच्या हातात पोहचला होता. गुरबाजने तात्काळ राहुल त्रिपाठी याला धावबाद केले. राहुल त्रिपाठी 55 धावांवर खेळत होता. संघाला गरज असताना बाद झाल्यामुळे राहुल त्रिपाठी निराश झाला. पेव्हेलियनमध्ये परत जाता जाता तो स्वत:चे अश्रू रोखू शकला नाही. तो पायऱ्यावरच बसून रडू लागला. राहुल त्रिपााठी याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वांनाच राहुल त्रिपाठी याच्या विकेटबाबत दु:ख झाले. तो चांगला लयीत होता. 






रसेलकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करण्यात आले.   बॅकवर्ड पॉईंटवर समदने रसेलच्या डावीकडे कट केला जो झेप मारुन अडवला आणि  फेकतो. रसेल थांबल्याचे त्रिपाठीला समजण्यापूर्वी दोन्ही फलंदाज प्रथम एकेरी धाव घेण्यासाठी धावले होते.  राहुल त्रिपाठी अर्ध्या खेळपट्टीवर आला होता.  गुरबाजने पहिल्यांदा गोलंदाजाच्या टोकाकडे फेकण्याचा विचार केला, पण त्याच्या शेवटी संधी आहे हे समजलं. गुरबाजने तात्काळ स्टम्ब उडवल्या आणि त्रिपाठी अस्वस्थ झाला. तो ड्रेसिंग रूमच्या पायऱ्यांवर बसून रडला.  










राहुल त्रिपाठीचं शानदार अर्धशतक - 


हैदराबादची फलंदाजी ढेपाळल्यानंतरही राहुल त्रिपाठी याने शानदार फलंदाज केली. त्याने कोलकात्याच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने हैदराबादची धावसंख्या वाढवली. राहुल त्रिपाठी याला कोणताही गोलंदाज बाद करु शकला नाही, तो धावबाद झाला. राहुल त्रिपाठी याने 35 चेंडूमध्ये 55 धावांची झंझावती खेळी केली.  या खेळीमध्ये त्रिपाठी याने एक षटकार आणि सात चौकारांचा समावेश आहे.