KKR vs SRH Live Score IPL Qualifier 1: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये क्वालिफायर एक हा सामना सुरु झाला आहे. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. हैदराबाद आणि हैदराबाद संघामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. मागील सामन्यातील संघ कायम ठेवण्यात आला आहे. 


कोलकाता नाइट रायडर्सची प्लेइंग इलेव्हन-
रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, वैभव अरोरा , श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि मिचेल स्टार्क. [इम्पॅक्ट सब: नितीश राणा]


सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन-


ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, नीतीश रेड्डी, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार),टी नटराजन , भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत  [इम्पॅक्ट सब: सनवीर सिंह, उमरान मलिक]


कोलकाता विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड


कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत 26 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये कोलकाताने मोठी आघाडी घेतली असून 17 सामने जिंकले आहेत, तर हैदराबादला केवळ 9 सामने जिंकता आले आहेत. अशा स्थितीत आजच्या क्वालिफायर सामन्यातही केकेआर संघ हैदराबादवर वर्चस्व गाजवताना दिसतो. 






क्वालिफायरसाठी राखीव दिवस नाही -


आयपीएल 2024 फायनलसाठी फक्त राखीव दिवस ठेवण्यात आलाय. प्लेऑफच्या इतर कोणत्याही सामन्यासाठी आयपीएलकडून राखीव दिवस ठेवण्यात आला नाही. क्वालीफायर 1, एलिमेनेटर आणि क्वालिफायर 2 या सामन्यासाठी राखीव दिवस नाही. पावसाचा व्यत्यय आला तर कमीत कमी पाच षटकांचा समाना होईल. जर पाच षटकांचा सामना होणार नसेल तर सुपर ओव्हर घेत निकाल लावला जाईल. जर सुपर ओव्हरही होत नसेल तर गुणतालिकेतील अव्वल स्थानावर असणाऱ्या संघाला विजयी घोषित करण्यात येईल.