IPL 2022, PBKS vs GT : मुंबईतील ब्रेबॉन स्टेडिअमवर हार्दिक पंड्याचा गुजरात आणि मयांक अग्रवलाचा पंजाब या संघात लढत होणार आहे. गुजरातच्या धारधार गोलंदाजीपुढे पंजाबच्या भक्कम फलंदाजी, यांच्यातील द्वंद्व पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ संतुलित असल्यामुळे सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.
मयांकच्या नेतृत्वातील पंजाबने तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे गुजरातने आपल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. आपली विजयी घौडदौड कायम ठेवण्यासाठी गुजरातचा संघ मैदानात उतरेल. पंजाब संघ पॉवरप्लेच्या षटकांत हल्लाबोल करतो आणि उर्वरित डावांत धावांचा हाच वेग राखण्याचे समीकरण ठेवलं आहे. पंजाब पॉवर प्लेमध्ये तडाखेबंद फलंदाजी हेच गणित राहिलेय. लियॉम लिव्हिंगस्टोन मोठी फटकेबाजी करू शकतो. अनुभवी सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार मयांक अग्रवाल यांनी आतापर्यंत मोलाचे योगदान दिलेले नाही. पण आता पुन्हा एकदा शिखऱ लयीत येऊ शकतो. पंजाब संघात गोलंदाजीत कॅगिसो रबाडा आणि लेगस्पिनर राहुल चाहर यांच्यावर मदार असेल.
गुजरात संघाचा विचार केल्यास संघाची सर्वात कमकुवत बाजू फलंदाजी आहे. शुभमन गिल आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विजय शंकर आणि मॅथ्यू वेड फ्लॉप ठरले आहेत, तर राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलर यांच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही. गोलंदाजीत मोहम्मद शमी, राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन यांच्याकडून प्रभावी कामगिरी अपेक्षित आहे.
जाब किंग्स -मयांक अग्रवाल कर्णधार/फलंदाज भानूका राजपक्षे विकेटकिपरजितेश शर्मा विकेटकिपरजॉनी बेअरस्टो विकेटकिपरप्रभसिमरनसिंह विकेटकिपर शाहरुख खान फलंदाजशिखर धवन फलंदाज अंश पटेल गोलंदाजअर्शदीप सिंह गोलंदाजईशान पोरल गोलंदाजकगिसो रबाडा गोलंदाजसंदिप शर्मा गोलंदाजवैभव अरोरा गोलंदाजबलतेज सिंह गोलंदाजहरप्रीत ब्रार गोलंदाजराहुल चाहर गोलंदाजनॅथन इलिस गोलंदाज अथर्व तायडे अष्टपैलूबेन्नी हॉवेल अष्टपैलूराज बावा अष्टपैलूप्रेरक मंकड अष्टपैलूलियाम लिव्हिंगस्टोन अष्टपैलूओडियन स्मिथ अष्टपैलूऋषी धवन अष्टपैलूऋतिक चॅटर्जी अष्टपैलू
----------------------------
गुजरात टायटन्स -हार्दिक पड्या कर्णधार/अष्टपैलू मॅथ्यू वेड विकेटकिपरवृद्धीमान साहा विकेटकिपररहमानुल्लाह गुरबाज विकेटकिपर शुभमन गिल फलंदाज अभिनव मनोहर फलंदाजडेविड मिलर फलंदाजगुरकीत सिंह फलंदाजसाई सुदसेन फलंदाज राशिद खान गोलंदाजलॉकी फर्ग्युसन गोलंदाजअल्झारी जोसेफ गोलंदाजमोहम्मद शमी गोलंदाजदर्शन नालकंडे गोलंदाजडॉमनिक ड्रेक्स गोलंदाजजयंत यादव गोलंदाजनूर अहमद गोलंदाजप्रदीप सांगवान गोलंदाजयश दयाल गोलंदाजवरुण एरॉन गोलंदाजसाई किशोर गोलंदाज राहुल तेवातिया अष्टपैलूविजय शंकर अष्टपैलू