IPL 2022 : आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाता नाइट राइडर्डस (KKR) टॉपवर आहे. कोलकाताने चार सामन्यात तीन विजय मिळवत सहा गुण मिळवले आहेत. लखनौचेही तीन विजयासह सहा गुण आहेत. पण नेट रनरेटच्या जोरावर कोलकाता संघ अव्वल स्थानावर आहे, तर लखनौ दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या पराभवानंतर दिल्लीचा संघ सातव्या स्थानावर घसरला आहे. तर चेन्नई आठव्या स्थानावर आहे.

आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघ असलेल्या मुंबई आणि चेन्नई 15 व्या हंगमात तळाशी आहेत. हैदराबाद, चेन्नई आणि मुंबईला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. चेन्नई आणि मुंबईला लागोपाठ तीन पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर हैदराबाद संघाला दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

पाहा आयपीएल 2022 गुणतालिका –

POS TEAM PLD WIN LOST TIED N/R NET RR PTS  
1. कोलकाता 4 3 1 0 0 +1.102 6
2. लखनौ 4 3 1 0 0 +0.256 6
3. राजस्थान 3 2 1 0 0 +1.218 4
4. गुजरात 2 2 0 0 0 +0.495 4
5. पंजाब 3 2 1 0 0 +0.238 4
6. बेंगलोर 3 2 1 0 0 +0.159 4
7. दिल्ली 3 1 2 0 0 -0.116 2
8. चेन्नई 3 0 3 0 0 -1.251 0
9. मुंबई 3 0 3 0 0 -1.362 0
10. हैदराबाद 2 0 2 0 0 -1.825 0

 

पर्पल कॅपसाठी कोण आहे स्पर्धक - 

 

क्रमांक गोलंदाज सामने विकेट
1 उमेश यादव 4 9
2 युजवेंद्र चहल 3 7
3 आवेश खान  4 7