Punjab Kings In IPL : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील प्लेऑफचे सामने सुरु झाले आहेत. साखळी सामन्यात सरस कामगिरी करणारे चार संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. यामध्य गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंटस् आणि आरसीबीचा समावेश आहे. अन्य सहा संघाने आव्हान संपलेले आहे. यंदाच्या हंगामाआधी मयांग अग्रवालकडे कर्णधारपद सोपवणाऱ्या पंजाबचं नशीब बदलले नाही.... पंजाब संघाचे पुन्हा एकदा साखळी फेरीत आव्हान संपुष्टात आलेय...मागील आठ वर्षात पंजाबने फक्त एक वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवलाय... तर आयपीएलच्या इतिहासत पंजाब फक्त दोन वेळा प्लेऑफमध्ये पोहचलाय. 2008 आणि 2014 चा अपवाद वगळता पंजाबला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. 

यंदा दोन खेळाडूंना केले होते रिटेन -  आयपीएल 2022 च्या मेगा लिलावाआधी पंजाबने दोन खेळाडूंना रिटेन केले होते. मयांक अग्रवालला 12 कोटी तर अर्शदीप सिंहला चार कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. अशात लिलावात पंजाबकडे तब्बल 74 कोटी रुपये होते.. पंजाबने नवीन संघ तयार करण्याचा प्रयत्न केला... राहुलच्या जागी मयांक अग्रवालकडे नेतृत्वात सोपवण्यात आले. पण तरीही पंजाबचे नशीब बदलले नाही.. सलग चौथ्या वर्षी पंजाब गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर राहिलाय. 

आयपीएलचा पंजाबचा प्रवासPunjab Kings performance In IPL : पंजाबच्या संघाला आतापर्यंत आयपीएलचा चषक उंचावता आलेला नाही. पंजाबसाठी सर्वात चांगला हंगाम 2014 चा राहिला आहे. 2014 मध्ये पंजाबने अंतिम फेरीत धडक मारली होती. पण फायनलमध्ये पंजाबला कोलकात्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता..त्यानंतर 2008 मध्ये प्लेऑफमध्ये पोहचला होता..गुणतालिकेत पंजाबचा संघ तिसऱ्या क्रमांकावर पोहचला. इतर आयपीएल हंगामात पंजाबला प्लेऑपमध्ये पोहचता आले नाही. पंजाबने अनेकदा कर्णधार बदलले पण त्यांचं नशीब बदलले नाही...  

आयपीएलमध्ये पंजाब किंग्सची आतापर्यंतची कामगिरी -  2008 - प्लेऑफ2009- 5 व्या क्रमांकावर 2010- 8व्या क्रमांकावर 2011- 5व्या क्रमांकावर2012- 6व्या क्रमांकावर2013- 6व्या क्रमांकावर2014-  उप विजेते2015- 8व्या क्रमांकावर2016- 8व्या क्रमांकावर2017- 5व्या क्रमांकावर2018- 7व्या क्रमांकावर2019- 6व्या क्रमांकावर2020- 6व्या क्रमांकावर2021- 6व्या क्रमांकावर2022- 6व्या क्रमांकावर