Priyansh Arya hundred PBKS vs CSK IPL 2025 : दरवर्षी आयपीएलमध्ये असे चमत्कार घडतात ज्याची कल्पनाही कोण करत नसेल. स्टार नावे बाजूला ठेवली तर, काही नवीन आणि अज्ञात खेळाडू देखील या हंगामात तांडव घालत आहे.  मंगळवारी न्यू चंदीगडमध्येही असेच काहीसे घडले. पंजाब किंग्जचा नवा स्टार फलंदाज प्रियांश आर्यने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले. या हंगामातील हे पहिले शतक आहे. यासह, तो आयपीएलच्या इतिहासात पंजाबसाठी सर्वात जलद शतक करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. 24 वर्षीय प्रियांशने त्याच्या शतकी खेळीत 7 चौकार आणि 9 षटकार मारले. मनोरंजक गोष्ट म्हणजे शतक पूर्ण करताना प्रियांशने केवळ चौकार आणि षटकारांसह 82 धावा केल्या.

आयपीएल 2025 चा 22 वा सामना पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात पंजाबचा सलामीवीर फलंदाज प्रियांश आर्यने सुरुवातीपासूनच शानदार फलंदाजी केली. खलील अहमदविरुद्धच्या सामन्यात प्रियांशने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला, त्या हंगामात शतक करणारा दुसरा फलंदाज बनला. चेन्नईविरुद्ध प्रियांश आर्याने फक्त 39 चेंडूत पूर्ण केले. तो 42 चेंडूत 103 धावांची खेळी खेळल्यानंतर बाद झाला. नूर अहमदच्या चेंडूवर तो आऊट झाला.

आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा दुसरा भारतीय

प्रियांश आर्य आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. आतापर्यंत सर्वात जलद शतक करणारा भारतीय फलंदाज युसूफ पठाण आहे, ज्याने 2010मध्ये 37 चेंडूत शतक पूर्ण केले होते, तर प्रियांशने 39 चेंडूत शतक पूर्ण केले होते. तो पंजाब किंग्जसाठी शतक करणारा दुसरा सर्वात जलद फलंदाजही बनला आहे.

हे ही वाचा -

KKR vs LSG IPL 2025 : अबब.. 45 चौकार, 25 षटकार आणि 472 धावा! शेवटच्या षटकांत पंतच्या संघाचा चमत्कार, घरच्या मैदानावर KKRच्या पदरी पराभव