Punjab Kings vs Chennai Super Kings : इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 22 वा सामना मंगळवारी (8 एप्रिल) पंजाब किंग्ज (PBKS) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात चंदीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पंजाब किंग्जने चेन्नईविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघ या सामन्यात कोणताही बदल न करता खेळताना दिसतील.

पंजाब किंग्ज 3 पैकी 2 सामने जिंकून पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्ज 4 पैकी 1 सामना जिंकून पॉइंट टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आतापर्यंत 30 सामने झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्जने 16 जिंकले आहेत. पंजाब किंग्जने 14 जिंकले आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज संघाची प्लेइंग इलेव्हन 

रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मुकेश चौधरी, खलील अहमद आणि मथिशा पाथिराना

पंजाब किंग्ज संघाची प्लेइंग इलेव्हन

प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि युझवेंद्र चहल