Prithvi Shaw And Nidhi Tapadia : दिल्लीचा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ आयपीएलच्या सोळाव्या हंगामात अपयशी ठरला. पृथ्वीला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. खराब कामगिरीमुळे पृथ्वी शॉ याला टीकेचा सामना करावा लागला. आयपीएलआधीही एका वादामुळे पृथ्वी शॉ चर्चेत होता. आयपीएलमध्ये पृथ्वी फ्लॉप केलाय. साखळी फेरीतच पृथ्वीच्या दिल्लीचे आव्हान संपले.. पृथ्वीसह इतर फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळेच दिल्लीचे आव्हान संपुष्टात आले. आता पृथ्वी शॉ प्रेयसीमुळे चर्चेत आहे. पृथ्वी शॉ पहिल्यांदाच प्रेयसी निथी तापडिया हिच्यासोबत स्पॉट झालाय. पहिल्यांदाच या दोघांना पब्लिक प्लेसमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आलेय. २६ मे रोजी अबू धाबी येथे आयोजित IIFA अवार्ड शोमध्ये त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलेय. फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
निथी तापडिया मॉडेल असून अभिनयात करिअर करण्याची इच्छा आहे. दुबईतील आयआयएफए इव्हेंटमध्ये कपलने काळे कपडे घातले होते. पृथ्वी शॉने जॅकेट आणि शर्टसोबत काळ्या रंगाची जिन्स घातली होती. तर निधीने काळ्या रंगाची साडी घातलेली आहे. पृथ्वी शॉ आणि निधी हे कपल परफेक्ट दिसतेय.
पाहा व्हिडीओ
कोण आहे निधी तापडिया ?-
Who is Nidhi Tapadia : निधी तापडिया नाशिकची रहिवासी आहेत. तिचा जन्म 13 सप्टेंबर 1997 रोजी झाला. ती एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. निधी विशेषतः इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. इंस्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स आहेत. निधीने 2016 मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली.
निधीने प्रसिद्ध क्राईम शो सीआयडीमध्येही काम केले आहे. याशिवाय 2019 मध्ये निधीने पंजाबी गाणे जट्टा कोका या व्हिडीओमध्ये देखील अभिनय करताना दिसली आहे. निधी तापडिया आणि पृथ्वी शॉ एकमेकांना डेट करत असल्याची अनेकदा चर्चा होती. परंतु याची कोणत्याही प्रकारे पुष्टी झाली नव्हती. मात्र ता पृथ्वी शॉने व्हॅलेंटाईन डे वर एक स्टोरी टाकून सर्व काही क्लिअर झाले होते.
पृथ्वी शॉ याने दिली होती प्रेमाची कबुली -
14 फेब्रुवारी 2023 रोजी म्हणजेच यंदाच्या व्हॅलेंटाईन डे दिवशी भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर मॉडेल निधी तापडियासोबत एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यावर त्याने लिहिले की, माझ्या पत्नीला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा. विशेष म्हणजे स्टोरी शेअर केल्यानंतर काही मिनिटांतच त्याने ती डिलीट केली होती.