Prince Yadav takes the wicket of Travis Head : आयपीएलमध्ये आज सनरायजर्स हैद्राबाद आणि लखनौ सुपर जायंट्स आमने-सामने आहेत. हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जातोय. नाणेफेक जिंकल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या हैद्राबादने 12 षटकानंतर 110 धावा करत 4 विकेट्स पटकावल्या आहेत.
दरम्यान, हैद्राबादचा संघ सध्या फलंदाजीसाठी तगडा मानला जातोय. राजस्थान रॉयल्सविरोधात त्यांनी 286 धावा ठोकल्या होत्या. दरम्यान, चालू सामन्यात नवखा गोलदाज प्रिन्स यादवने कमाल केली आहे. त्याने कारकिर्दीतील दुसऱ्याच सामन्यात खतरनाक समजल्या जाणाऱ्या ट्रेविस हेडच्या दांड्या उडवल्या आहेत. तर दुसरीकडे अनसोल्ड राहिलेल्या शार्दुल ठाकूरने देखील कमाल केली आहेत. त्याने हैद्राबादच्या दोन फलंदाजांना तंबूत धाडलंय.
इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये (IPL 2025) लखनौ सुपर जायंट्सने सोमवारी (24 मार्च) विशाखापट्टणम येथील क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी या दोन युवा गोलंदाजांना संधी दिली होती. प्रिन्स यादव देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळत होता.
23 वर्षीय प्रिन्स यादव दिल्ली प्रीमियर लीग 2024 (DPL 2024) मध्ये सर्वाधिक बळी घेणारा पाचवा खेळाडू होता. डीपीएलमध्येही त्याने हॅटट्रिक घेतली. या लीगमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरला. दिल्लीकडून खेळताना त्याने 10 सामन्यात 13 विकेट घेतल्या.
सेंट्रल दिल्ली किंग्जविरुद्धच्या सामन्यात प्रिन्स यादवने हॅटट्रिक घेतली होती. सामन्याच्या 18 व्या षटकात प्रिन्सने प्रथम केशव दाबासला बाद केले होते..त्यानंतर त्याने सुमित कुमारला एलबीडब्ल्यू केले. तर फुल टॉसवर एलबीडब्ल्यू झालेल्या हरीश डागरला बाद करून त्याने हॅट्ट्रिक पूर्ण केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या