हैदराबाद : लखनौ सुपर जायंटस आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील मॅच हैदराबादमध्ये सुरु आहे. लखनौचा कॅप्टन रिषभ पंतनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रिषभ पंतचा हा निर्णय शार्दूल ठाकूरनं सार्थ ठरवला. शार्दूल ठाकूरनं हैदराबादच्या दोन स्फोटक फलंदाजांना सलग दोन बॉलवर बाद करत हादरे दिले. शार्दूल ठाकूरचा हा धमाका पाहून हैदराबादची संघ मालक असलेल्या काव्या मारनचा चेहरा पडल्याचं दिसून आलं. 

शार्दूल ठाकूरनं मॅचच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये हा धमाका केला. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर शार्दूल ठाकूरनं स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माला बाद केलं. त्यानंतर दुसऱ्या  बॉलवर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इशान किशानला गोल्ड डकवर शार्दूलनं बाद केलं.  

शार्दूल ठाकूरनं त्यापूर्वी पहिली ओव्हर टाकली होती. त्यात त्यानं केवळ 6  धावा दिल्या. यामध्ये त्यानं ट्रेविस हेडला 5  बॉल टाकले होते, त्यापैकी केवळ एका बॉलवर हेडनं चौकार मारला.शार्दूल ठाकूरनं तिसऱ्या ओव्हरमध्ये दोन विकेट घेताच काव्या मारनची प्रतिक्रिया पाहण्यासारखी झाली होती. 

काव्य मारनचा चेहरा पडला

शार्दूल ठाकूरनं सलग दोन बॉलवर दोन्ही आक्रमक फलंदाजांना बाद करताच संघाची मालकीण काव्या मारनचा चेहरा पडला होता. काव्या मारनचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  विशेष बाब म्हणजे शार्दूल ठाकूर आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता. लखनौचा मोहसीन खान दुखापतग्रस्त असल्यानं त्याच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी मिळाली होती. ज्याचं त्यानं सोनं केलं आहे. त्यानं आतापर्यंत चार विकेट घेतल्या आहेत.

सनरायजर्स हैदराबादचा संघ 

अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, ईशान किशन, नीतीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

लखनौ सुपर जायंटसचा संघ

एडिन मार्कराम, मिशेल मार्श, निकोलस पूरन, रिषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), डेविड मिलर, आयुष बदोनी, शार्दूल ठाकुर, रवि बिश्नोई, आवेश खान, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव