Mumbai Indians 2025 अहमदाबाद : मुंबई इंडियन्सचा संघ सध्या अहमदाबादमध्ये आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचसाठी मुंबईचा संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे.पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे. शनिवारी 29 मार्चला मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील मॅच नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या मॅचपूर्वी रोहित शर्मा, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तिघांनी मिळून एका व्यक्तीला स्विमिंग पूलमध्ये फेकताना दिसून आले.
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव अन् तिलक वर्मानं स्विमिंग पूलमध्ये फेकलं? व्हायरल व्हिडिओ मुंबईची टीम जिथं थांबलीय त्या हॉटेलमधील आहे. या व्हिडिओत रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि त्यांच्यासोबत एक गार्ड आहे. सर्वजण एका व्यक्तीजवळ जातात, त्याला उचलतात आणि स्विमिंग पूल जवळ घेऊन जातात. व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती मुंबई इंडियन्सचा सोशल मिडिया अॅडमिन असल्याचा दावा करण्यात येतोय.
मुंबईला पहिल्या विजयाची प्रतीक्षा
मुंबई इंडियन्सला पहिल्या मॅचमध्ये चेन्नई विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. आता 29 मार्चला मुंबईचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे. ही मॅच अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजता सुरु होईल. मुंबई इंडियन्सप्रमाणं गुजरात टायटन्सला पहिल्या मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. दोन्ही संघ दुसऱ्या मॅचमध्ये विजयाच्या इराद्यानं आमने सामने आले आहेत.
हार्दिक पांड्याचं कमबॅक
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सची फलंदाजी अयशस्वी ठरली. हार्दिक पांड्याला स्लो ओव्हर रेटमुळं पहिल्या मॅचपासून बाहेर राहावं लागलं होतं.चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई विरुद्ध सूर्यकुमार यादव कॅप्टन होता. आता हार्दिक पांड्या गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबईचं नेतृत्त्व करेल. रोहित शर्माला चेन्नई विरुद्ध खातं उघडता आलं नव्हतं. रयान रिकल्टन (13) आणि विल जॅक्स (11) धावा करुन बाद झाला होता. तिलक वर्मानं 31 तर सूर्यकुमार यादवनं 29 धावा केल्या होत्या.