IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामाचं बिगुल वाजले आहे. 26 मार्चपासून आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. यंदा आयपीएलमध्ये दहा संघ खेळणार आहेत. लखनौ आणि गुजरात हे दोन संघ यंदापासून सहभागी झाले आहेत. आयपीएलमधील सर्व संघानी विजेतेपदासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 2021 चा विजेता चेन्नई आणि उपविजेता कोलकाता या संघामध्ये यंदाचा पहिला सामना होणार आहे.
आयपीएलच्या 15 व्या हंगामापूर्वी झालेल्या मेगा लिलावात अनेकांनी कोट्वधी रुपये मोजून खेळाडूंना खरेदी केले. तर लिलिवाआधी काही संघानी महत्वाच्या खेळाडूंना कायम ठेवलं. आयपीएल 2022 साठी कोलकाता, पंजाब आणि आरसीबी या संघानी नवीन कर्णधारांना नियुक्त केले आहे. कोलकाता संघाने मुंबईकर श्रेयस अय्यरकडे नेतृत्व सोपवलेय. तर आरसीबीने फाफ डू प्लेसिसवर डाव खेळला आहे. पंजाब किंग्सने मयंक अग्रवालला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. त्याशिवाय दोन नवीन संघामध्ये लखनौ संघाची धुरा केएल राहुल तर गुजरात संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे. पाहूयात आयपीएलमधील दहा संघाच्या कर्णधारांना किती पगार आहे......
1- दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत, 16 कोटी रुपये
2- रॉयल चैलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार, फाफ डू प्लेसिस 7 कोटी रुपये
3- चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार, एमएस धोनी 12 कोटी रुपये
4- मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा, 16 कोटी रुपये
5- पंजाब किंग्सचा कर्णधार, मयंक अग्रवाल 14 कोटी रुपये
6- सनराइजर्स हैदराबादचा कर्णधार, केन विलियमसन 14 कोटी रुपये
7- लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार, केएल राहुल 17 कोटी रुपये
8- कोलकाता नाइट राइडर्स संघाचा कर्णधार, श्रेयस अय्यर 12.25 कोटी रुपये
9- राजस्थान रॉयल्सचा कर्णधार, संजू सॅमसन 14 कोटी रुपये
10- गुजरात टाइटंस संघाचा कर्णधार, हार्दिक पांड्या 15 कोटी रुपये.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live