PKBS Vs PBKS: मुंबईच्या (Mumbai) वानेखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) आज आयपीएल 2022 चा 38 वा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज (Panjab Kings Vs Chennai Super Kings) एकमेकांशी भिडणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्जचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) नव्या विक्रमाला गवसणी घालणार आहे. आयपीएलमधील 6000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी शिखर धवनला फक्त दोन धावांची गरज आहे. 


शिखर धवननं आतापर्यंत आयपीएलचे 201 सामने खेळले आहेत. ज्यात 34. 67 च्या सरासरीनं त्यानं 5 हजार 998 धावा केल्या आहेत. यात दोन शतक आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटनंतर शिखर धवनं दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 215 सामन्यांत 36.58 च्या सरासरीनं 6 हजार 402 धावा केल्या आहेत. त्यानंतर रोहित शर्मा 5 हजार 764 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 221 सामन्यात अशी कामगिरी केली आहे. 


आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर
आयपीएलमध्ये शिखर धवननं आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज ठरला आहे. त्याच्या नावावर 675 चौकारांची नोदं आहे. त्यानंतर विराट कोहलीचा क्रमांक लागतो. त्यानं आयपीएलमध्ये 555 चौकार मारले आहेत. तसेच 534 चौकारांसह डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे.


ऑक्शनमध्ये पंजाबच्या संघानं शिखर धवनवर लावली बोली
आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी दिल्लीच्या संघानं शिखर धवनला रिलीज केलं. त्यानंतर पंजाब किंग्जनं त्याला 8.25 कोटीत विकत घेऊन संघात सामील केलं. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात शिखर धवननं 7 सामन्यांमध्ये 30. 57 च्या सरासरीनं 214 धावा केल्या आहेत. ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. 


हे देखील वाचा-