IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम रोमांचक स्थितीत पोहचला आहे. या हंगामातील पहिला टप्पा संपला असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघ प्रयत्न करताना दिसत आहेत. सलग आठ सामने गमावून मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. नऊ संघाला अजूनही प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरातचा संघ अव्व स्थानावर आहे. तर, एकही सामना जिंकता न आलेला मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे.

आज पंजाबच्या संघाशी भिडणार चेन्नईचा संघआज पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 38 वा सामना खेळला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या हंगामात पंजाब किंग्जनं सात सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, चेन्नईच्या संघाला सात पैकी केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत. यामुळं आजचा सामना रोमांचक होण्याची दाट शक्यता आहे.

आयपीएल 2022 ची गुणतालिका-

क्रमांकसंघसामनेविजयपराभवअनिर्णितNRगुणNRR
1गुजरात टायटन्स7610012+.396
2सनरायझर्स हैदराबाद7520010+0.691
3राजस्थान रॉयल्स7520010+0.432
4लखनऊ सुपर जायंट्स8530010+0.334
5रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर642008-0.472
6दिल्ली कॅपिटल्स734006-0.715
7कोलकाता नाईट रायडर्स835006+0.080
8पंजाब किंग्स734006-0.562
9चेन्नई सुपर किंग्स725002-0.534
10मुंबई इंडियन्स808000-1.000

पंजाब किंग्ज- चेन्नई सुपर किंग्ज हेड टू हेड रेकॉर्डपंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज 27 वेळा आमने सामने आले आहेत. त्यापैकी चेन्नई सुपर किंग्जनं 16 सामने जिंकले आहेत. तर, पंजाबच्या संघानं 11 सामने जिंकले आहे. ही आकडेवारी पाहता चेन्नईच्या संघाचं पारडं जड दिसत आहे. परंतु, या हंगामातील पहिल्या टप्प्यात चेन्नई- पंजाब एकमेकांशी भिडले होते. या सामन्यात पंजाबच्या संघानं विजय मिळवला होता. 

हे देखील वाचा-