LSG vs MI: मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 37 व्या सामन्यात लखनौच्या संघानं मुंबईला 36 धावांनी पराभूत केलं. या हंगामातील मुंबईच्या संघाचा सलग आठवा पराभव आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबईच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लखनौच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून मुंबईसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावून 132 धावा करता आल्या. मुंबईच्या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) फलंदाजांच्या कामगिरीवर निराशा व्यक्त केली.
लखनौच्या संघानं दिलेल्या 169 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघाची सुरुवात खराब झाली. लखनौच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत मुंबईचा सलामीवीर ईशान किशन आणि डेवॉल्ड ब्रेवीसला स्वस्तात माघारी धाडलं. त्यानंतर रोहित शर्मानं संघाचा डाव सावरला. पंरतु, क्रुणाल पांड्यानं रोहित शर्माला आपल्या जाळ्यात अडकवलं. रोहितनं 31 चेंडूत 39 धावा केल्या. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मुंबईच्या संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आली. मात्र, आयुष बदोनीनं त्याला सात धावांवर बाद करून माघारी धाडलं. मुंबईचे चार विकेट्स पडल्यानंतर मैदानात आलेल्या तिळक वर्मानं आक्रमक फलंदाजी केली. परंतु, तोही संघाला विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला. त्यानंतर मुंबईची शेवटची आशा पोलार्डही क्रुणाल पांड्याच्या गोलंदाजीवर बाद झाला. मुंबईनं 20 षटकात 8 विकेट्स गमावून 132 धावा केल्या.
रोहित शर्मा काय म्हणाला?
मुंबईची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली होती. परंतु, लखनौच्या संघानं चांगली गोलंदाजी करत मुंबईच्या फलंदाजाला रोखलं. मुंबईच्या फलंदाजांनी भागीदारी करण्याची गरज होती. मुंबईची फलंदाजी चांगली झाली नाही. मधल्या फळीतील फलंदाजांनी संयमी खेळी करण्याची गरज होती. परंतु, काही खेळाडू बेजबाबदारपणानं शॉट्स खेळ खेळले. ज्यामुळं मुंबईचा पराभव झाला, अशा शब्दात रोहित शर्मा संघातील फलंदाजांवर बरसला.
हे देखील वाचा-