ट्रेंडिंग
PBKS vs RCB IPL 2025 Qualifier 1 : क्वालिफायर सामन्यात RCB ची ताकद झाली दुप्पट, विराटचा जिगरी परतला! युजवेंद्र चहल मात्र बाहेर, जाणून प्लेइंग-11
PBKS vs RCB Qualifier 1 : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना गुरुवारी खेळवला जात आहे.
PBKS vs RCB Qualifier 1 : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना गुरुवारी खेळवला जात आहे. मुल्लानपूर येथे होणाऱ्या या सामन्यासाठी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs PBKS) आमनेसामने आहेत. हा सामना जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये जाईल. अशा परिस्थितीत, दोन्ही संघ सामना जिंकण्यासाठी उत्सुक असतील. सामना सुरू होण्यापूर्वी नाणेफेकीचा नाणेफेक करण्यात आली, ज्याचा कौल आरसीबीच्या बाजूने पडला आणि रजत पाटीदारने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
आरसीबीमध्ये विराटचा जिगरी परतला...
पंजाब किंग्ज विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतरआरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने सांगितले की, प्लेइंग 11 मध्ये बदल करण्यात आला आहेत. एक खतरनाक वेगवान गोलंदाज संघात परतला आहे. हा गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून जोस हेझलवूड आहे. हेझलवूड लीग टप्प्यात 4 सामने खेळला नाही, परंतु आता प्लेऑफ येताच तो प्लेइंग 11 मध्ये परतला आहे. आरसीबी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी ही चांगली बातमी आहे.
पंजाब किंग्जसाठी वाईट बातमी...
आयपीएल 2025चे प्लेऑफ सुरू झाले आहेत आणि युजवेंद्र चहल प्लेइंग 11 मध्ये परतू शकला नाही. ही पंजाब किंग्ज संघासाठी चांगली बातमी नाही. दुखापतीमुळे चहल स्टेजमध्ये दोन सामने खेळू शकला नाही. संघाचा कर्णधार अय्यरने चहलबाबत कोणतीही अपडेट दिलेली नाही. पण, चाहत्यांना आशा आहे की तो आगामी सामन्यांमध्ये परत येईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची प्लेइंग-11
विराट कोहली, फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार , लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवुड, सुयश शर्मा.
पंजाब किंग्ज संघाची प्लेइंग-11
प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, जोश इंग्लिस, श्रेयस अय्यर, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमातुल्ला ओमरझाई, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, काइल जेमिसन.
हे ही वाचा -