मोहाली :आयपीएलची (IPL 2024) दुसरी लढत दिल्ली आणि पजाब यांच्यात पार पडली. या लढतीत पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या दिल्लीनं (Delhi Capitals) 9 बाद 174 धावा केल्या.अभिषेक पोरेल (Abhishek Porel) याच्यामुळं दिल्लीला 174 धावांपर्यंत मजल मारता आली. अभिषेक पोरेल यानं हर्षल पटेलनं टाकलेल्या 20 व्या ओव्हरमध्ये 25 धावा केल्यांन दिल्लीनं समाधानकारक धावसंख्या उभारली होती. 174  धावांचा पाठलाग करताना पंजाबनं आक्रमक सुरुवात केली होती. शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि जॉनी बेअरस्टो यांनी फटकेबाजी सुरु केली होती. मात्र, इशांत शर्मानं (Ishant Sharma) दोघांना माघारी पाठवलं. 


शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो कसे बाद झाले?


दिल्लीनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन यानं आक्रमक बॅटिंग सुरु केली होती. पंजाबनं पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा काढल्या होत्या. शिखर धवननं 16 बॉलमध्ये 22 धावा केल्या होत्या. इशांत शर्मा डावाची चौथी ओव्हर टाकत असताना शिखर धवननं त्याला क्लीन बोल्ड केलं. यानंतर त्याच ओव्हरमध्ये दोन चौकार मारत आक्रमक सुरुवात करणारा पंजाबचा दुसरा सलामीवीर जॉनी बेअरस्टो देखील धावबाद झाला.प्रभासिमरन सिंगनं अंपायरच्या दिशेनं मारलेल्या बॉलला इशांत शर्माचा हात लागला आणि तो बॉल स्टंम्पवर आदळला. यावेळी जॉनी बेअरस्टो नेमका क्रीजबाहेर होता. त्यामुळं तो बाद झाला. 






पंजाबची विजयानं सुरुवात


पंजाबनं 2024 च्या आयपीएलमध्ये विजयी सुरुवात केली आहे.  पंजाबनं चार विकेट राखून विजय मिळवला. सॅम करन आणि लिविंगस्टन याच्या खेळीच्या जोरावर पंजाबनं विजय मिळवला. शिखर धवन 22, प्रभासिमरन सिंग 26, सॅम करन 63 आणि लिविंस्टन याच्या  36 धावांच्या जोरावर पंजाबनं 4 विकेटनं विजय मिळवला. 






दिल्लीकडून खलील अहमदनं 4 ओव्हरमध्ये 43 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतल्या. इशांत शर्मानं दोन ओव्हरमध्ये 16 धावा देत एक विकेट घेतली.  मिशेल मार्शनं 4 ओव्हर्स टाकल्या त्यानं 52 धावा दिल्या. अक्षर पटेलनं 4 ओव्हर्समध्ये 25 धावा दिल्या. कुलदीप यादवनं 4 ओव्हर्समध्ये 20 धावा देत 2 विकेट घेतल्या. 


दिल्लीकडून होपनं 33 धावा केल्या. अभिषेक पोरेल हा इम्पॅक्ट प्लेअर ठरला त्यानं 31 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरनं 29 तर अक्षर पटेल यानं  21 धावा केल्या.जवळपास सव्वा वर्षानंतर मैदानावर कमबॅक करणारा रिषभ पंत केवळ 18 धावा करुन बाद झाला. अभिषेक पोरेलनं डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 25 धावा काढल्यानं दिल्लीचा संघ 174 धावांपर्यंत पोहोचला होता. 


संबंधित बातम्या :


CSK vs RCB: रवींद्र जडेजाचं षटकारांचं शतक पूर्ण, सिक्सर मारणाऱ्यांच्या यादीत पहिलं कोण? रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी


अभिषेक पोरेलचा इम्पॅक्ट, 10 चेंडूत सामना फिरवला, दिल्लीचं पंजाबपुढे 175 धावांचं आव्हान