Pakistan Squad T20 World Cup 2024 : आगामी टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली. बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानचा संघ विश्वचषकात उतरणार आहे. पाकिस्तानच्या संघात मोहम्मद आमिरचं कमबॅक झालेय. त्याशिवाय मोहम्मद रिझवान आणि हॅरिस रौफ यांना ताफ्यात संधी दिली आहे, पण त्यांच्या फिटनेसबाबत पीसीबी चिंतेत आहे. पाकिस्तानच्या ताफ्यात फिरकी अष्टपैलू मोहम्मद नवाज याला स्थान देण्यात आलेले नाही. 


हॅरीस रौफच्या फिटनेसवर चिंता 


वेगवान गोलंदाज हॅरीस रौफ पूर्णपणे फीट नसल्याचे सांगण्यात येत आहे. नेट्समध्ये तो मेहनत घेत आहे, पण 100 टक्के फिट नसल्याचं समजतेय. रौफ याने जानेवारी 2024 मध्ये न्यूझीलंडविरोधात अखेरचा सामना खेळला होता. त्याच्या निवडीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.  PCB ऑफिशियल्सने दावा केलाय की, रौफ विश्वचषकात चांगली कामगिरी करेल. त्याच्या भेदक माऱ्याचा पाकिस्तानला फायदा होईल. पाकिस्तानचे चाहत्यांमध्ये मात्र






मोहम्मद आमिरचं पाकिस्तानच्या ताफ्यात कमबॅक 


वेगावान गोलंदाज मोहम्मद आमिर याचं पाकिस्तानच्या संघात कमबॅक झालेय. मोहम्मद आमिर, सलमान बट आणि मोहम्मद आसिफ यांना स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली आयसीसीने बॅन केले होते. 2015 आधी या तिन्ही खेळाडूंवर प्रतिबंध घातले होते. 2016 मध्ये मोहम्मद आमिर याने पाकिस्तानच्या संघात कमबॅक केले होते. त्यानंतर 2020 मध्ये त्याने निवृत्तीची घोषणा केली. पाकिस्तान क्रिकेटमधील अंतर्गत कलहामुळे आमिरने निवृत्ती घेतली होती. टी20 विश्वचषक 2024 आधी मोहम्मद आमिर याने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता. त्याचं संघात कमबॅक झालं. आता त्याला विश्वचषकात स्थान देण्यात आले. 


टी20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ : 


बाबर आजम (कर्णधार), अब्रार अहमद, आजम खान, फखर जमान, हॅरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सैम अय्यूब, शादाब खान, शाहीन शाह अफरीदी, उस्मान खान.


 






दोन जून पासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकात पहिल्यांदाच 20 संघ सहभागी होत आहेत. पाकिस्तान आणि भारतीय संघ एकाच गटामध्ये आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.