No Ball dispute In IPL 2024 : आयपीएल 2024 चा हंगाम आता उत्तार्धाकडे झुकला आहे. यंदाच्या हंगामात अंपायरिंग खूपच साधारण पाहायला मिळाली. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (KKR vs RCB) यांच्यात झालेल्या स्पर्धेतील 36 व्या सामन्यात नो बॉलवरुन वाद निर्माण झाला होता. विराट कोहलीला (Virat Kohli) हर्षित राणाने टाकलेला चेंडू कमरेपेक्षा उंचीवर असतानाही पंचांनी नो बॉल दिला होता. त्यावर सोशल मीडियावर वाद सुरु झाला होता. हा वाद शांत होतो ना होतो तोच आता नो बॉलवरुन आणखी दावे-प्रतिदावे केले जात आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स (CSK vs LSG) यांच्यातील सामन्यादरम्यान रवींद्र जाडेजानं (Ravindra Jadeja) टाकलेल्या चेंडूवरुन वाद सुरु झालाय. 


कोलकाता आणि आरसीबी (KKR vs RCB) यांच्यातील सामन्यादरम्यान टाकलेल्या फुलटॉस नो बॉलशिवाय एक षटकार आणि अन्य नो बॉलवरुन वाद झाला होता. सामन्यानंतर चाहत्यांकडून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. इरफान पठाण आणि नवज्योत सिंह सिद्धू यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. पण मंगळवारी चेन्नई आणि लखनौ यांच्यातील सामन्यावेळी पंचानी रवींद्र जाडेजानं टाकलेला चेंडू नो बॉल दिला. पण फुटेजमध्ये तो चेंडू लिगल असल्याचं दिसत आहे. यावरुन आता वादाला सुरुवात झाली आहे.






नेटकऱ्यांचा दावा - 


लखनौ आणि चेन्नई यांच्यातील सामन्यादरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोतील पहिल्या भागात कोलकाता आणि आरसीबी या सामन्यातील फोटो आहे, ज्यामध्ये गोलंदाज चेंडू टाकताना क्रीज सोडल्याचं दिसत आहे. या चेंडूला नो बॉल म्हटलं जात होतं, पण पंचांनी त्याला लीग चेंडू म्हणून दाखवलं. तर दुसऱ्या भागातील फोटो हा चेन्नई आणि लखनौ यांच्यातील सामन्याचा आहे. रवींद्र जाडेजा टाकत असलेला चेंडू फोटोमध्ये लीगल दिसत आहे. पण पंचांनी तो चेंडू नो बॉल असल्याचं सांगितलेय. यावरुन चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आरसीबीसाठी वेगळे नियम आहेत का? असा सवाल नेटकऱ्यांकडून करण्यात येतोय.


आणखी वाचा :


MS Dhoni DRS : धोनी रिव्यू सिस्टीम, माहीच्या निर्णयानं पंचांवर निर्णय फिरवण्याची वेळ, मॅचमध्ये नेमकं काय घडलं?