Suryakumar Yadav Mumbai Indians: जागतिक ट्वेन्टी-20 क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या सूर्यकुमार यादवने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) तंदुरुस्तीच्या चाचणीत जवळपास सर्व निकष पूर्ण केले आहेत. याबाबत काल (03 एप्रिल) माहिती समोर आली होती. 


आज सूर्यकुमारची आणखी एक चाचणी झाली. यामध्ये सूर्यकुमार यादव पुर्णपणे तंदुरुस्त असून तो उद्याच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे 7 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार खेळू शकतो. सूर्यकुमारने आपला अखेरचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेन्टी-20 मालिकेत खेळला होता. 






हार्दिक पांड्याला दिलासा


मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या याचं देखील सूर्यकुमार यादवच्या कमबॅकमुळं टेन्शन मिटणार आहे. सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सकडून चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर बॅटिंग करतो. तो संघात नसल्यानं हार्दिक पांड्याला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यावं लागत होतं. ती समस्या आता दूर होऊ शकते. मुंबईला गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमध्ये 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. सूर्यकुमार यादव संघात परतल्यानं हार्दिक पांड्याला दिलासा मिळणार आहे. 


मुंबई पहिला विजय मिळवणार?


मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आता सूर्यकुमार यादवसारखा मिस्टर 360 अशी ओळख असलेला हुकमी एक्का संघात परतल्यानं मुंबई दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये पहिला विजय मिळवणार का हे पाहावं लागेल. 


मुंबईचा संघ तळाशी - 


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला आतापर्यंत एकही विजय नोंदवता आला नाही. तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. गुणतालिकेत मुंबईचा संघ दहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. मुंबई हा एकमेव असा संघ आहे, ज्याला अद्याप एकही विजय नोंदवता आला नाही. 


सूर्यकुमारची आयपीएलमधील कारकीर्द- 


सूर्यकुमार यादवने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 139 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 124 डावांमध्ये 31.85 च्या सरासरीने आणि 143.32 च्या स्ट्राइक रेटने 3249 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 1 शतक आणि 21 अर्धशतके झळकावली आहेत, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या 103 धावा आहे.


संबंधित बातम्या:


हार्दिक पांड्यावर चाहत्यांचा रोष का वाढला?; रवी शास्त्रींनी सांगितले यामगील एकमेव कारण!


DC vs KKR: दिल्लीच्या पंतने गोलंदाजाला धुतलं, केकेआरच्या मालकाने काय केलं?, शाहरुन खानचं होतंय कौतुक,Video


आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, Photos