मुंबई : मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आयपीएलचं  17 वं पर्व निराशाजनक ठरलं. मुंबईची टीम आयपीएल (IPL 2024) प्लेऑफमधून पहिल्यांदा बाहेर पडली होती. मुंबई इंडियन्सला पाचवेळा विजेतेपद मिळूवन देणारा माजी कॅप्टन रोहित शर्मा पुढील आयपीएल कोणत्या संघाकडून खेळणार याबाबत तर्क वितर्क सुरु आहेत. मुंबई इंडियन्सचे कोच मार्क बाऊचर यांनी एक वक्तव्य केलंय. त्या वक्तव्यामुळं तिढा आणखी वाढलाय. मार्क बाऊचर म्हणाले रोहित शर्मा स्वत:च्या भविष्याचा मालक आहे. आयपीएलच्या आगामी मेगा ऑक्शनसंदर्भात रोहित शर्माच्या आगामी प्लॅनबाबत काही माहिती नसल्याचं देखील मार्क बाऊचर म्हणाले. 


रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्त्व करतोय. मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माच्या जागी नेतृत्त्व करण्याची संधी हार्दिक पांड्याला दिली होती, हार्दिक पांड्याला ट्रेड करुन संघात स्थान देण्यात आलं होतं. 


रोहित शर्मानं या आयपीएलमध्ये एक शतक आणि एका अर्धशतकासह सर्वाधिक 417 धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नावावर आहेत. रोहितनं एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं आहे. रोहित शर्मानं 68 धावांची खेळी केल्यानंतर तो बाद झाला. यानंतर मैदानाबाहेर जाताना वानखेडे स्टेडियमवरील प्रेक्षकांनी उभं राहूनन त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या.


रोहित पुढील आयपीएल कुणाकडून खेळणार?


मार्क बाऊचर यांनी प्रामाणिकपणे सांगतो असं म्हणत रोहित शर्माच्या भविष्यातील नियोजनाबाबत काही माहिती नसल्याचं म्हटलं. मी काल रात्री त्याच्यासोबत चर्चा केली. आयपीएलनंतर पुढं काय असा प्रश्न रोहित शर्माला विचारण्यात आला. त्यावर त्यानं टी-20 वर्ल्ड कप असं उत्तर दिल्याचं बाऊर यांनी म्हटलं. हे योग्य आहे मला त्यच्या भविष्याबाबत जाणून घ्यायचं होतं. माझ्या हिशोबानं रोहित शर्मा स्वत :च्या नशिबाचा मालक आहे. पुढील आयपीएलपूर्वी मेगा ऑक्शन आहे, काय होईल हे कुणाला माहिती नाही, असं बाऊचर म्हणाले. 


  
मार्क बाऊचर यांनी रोहित शर्मासाठी यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी दोन सत्रात विभागली जाऊ शकते. मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करुन देखील मुंबईच्या निकालानंतर तो निराश असेल. रोहित शर्मानं चांगली सुरुवात केली होती. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध शतक देखील केलं होतं. रोहितचा हाच फॉर्म कायम राहील,असं वाटलं होतं असं बाऊचर म्हणाले.  


संबंधित बातम्या :


Rohit Sharma: एका ऑडिओनं वाट लावली.., व्हायरल व्हिडीओनंतर रोहित शर्मा अलर्ट, कॅमेरामनपुढं हात जोडले , पाहा व्हिडीओ 


Hardik Pandya : हार्दिक पांड्याला दुहेरी धक्का, मुंबईच्या कॅप्टनवर एका मॅचसाठी बंदी, लाखोंचा दंड, बीसीसीआयचा दणका