Ravi Shastri On Rahul Tripathi: आयपीएलच्या पंधराव्या हंगाम अखेरच्या टप्प्यावर पोहचला आहे. यंदाच्या हंगामातील लीग स्टेजमधील फक्त पाच सामने उरले आहेत. मंगळवारी सनरायजर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सला पराभूत करून त्यांचं प्लेऑफमधील आशा जिवंत ठेवल्या आहेत. या सामन्यात हैदराबादचा मधल्या फळीचा फलंदाज राहुल त्रिपाठीनं तुफानी अर्धशतक ठोकलं. राहुलच्या या खेळीनंतर टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याच्याबद्दल मोठा दावा केला आहे. लवकरच राहुल त्रिपाठी भारतील संघात स्थान मिळवेल, अशीही आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
रवि शास्त्री काय म्हणाले?मुंबईविरुद्ध सामन्यात राहुल त्रिपाठीनं 172.73 च्या स्टाईक रेटनं 44 चेंडूत 76 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्यानं तीन षटकार मारले आहेत. राहुल त्रिपाठी भारतीय क्रिकेट संघाचा दरवाजा ठोठवताना दिसत आहे. लवकरच तो भारतीय संघात स्थान मिळवण्याची शक्यता आहे. तो तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करतो. सतत त्याच्या बॅटमधून धावा निघल्यास लवकरच भारतीय क्रिकेट संघाचे निवडकर्ते त्याच्याबाबत नक्कीच विचार करतील. त्रिपाठी हा खूप आत्मविश्वासी खेळाडू आहे. त्याच्याकडे शॉट्सची चांगली निवड मला जास्त आवडते. तो एक प्रभावी खेळाडू आहे", असं रवी शास्त्री म्हणाले आहेत.
आयपीएल 2022 मधील राहुल त्रिपाठीचं प्रदर्शनआयपीएल 2022 च्या या हंगामात त्रिपाठीनं हैदराबादसाठी 39.30 च्या सरासरीनं आणि 161.72 च्या स्ट्राइक रेटनं तीन अर्धशतकांसह 393 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 39 चौकार आणि 19 षटकार आले. शास्त्री यांनी त्रिपाठीच्या निडर फलंदाजीचे कौतुक केले, तो कोणत्याही गोलंदाजासमोर निडरपणे उभा राहून आपल्या शैलीत फलंदाजी करतो.
हे देखील वाचा-