IPL 2022 Playoffs : आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा चषक उंचावणारा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians). त्यांनी तब्बल पाच वेळा विजय मिळवला आहे. तर त्यांच्यानंतर दुसऱ्या स्थानावर असणारा संघ म्हणजे चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Superkings). त्यांनी चार वेळा स्पर्धेत विजय मिळवला आहे. पण यंदा या दोन्ही संघाची कामगिरीच सर्वात खराब असून मुंबईने सहा पैकी सहा तर चेन्नईने सहा पैकी पाच सामने गमावत अनुक्रमे दहावं आणि नववं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे या संघाच्या चाहत्यांना ते यंदा पुढील फेरीत जाणार का हा प्रश्न सतावत आहे. दोन्ही संघाचा भविष्यातील खेळच या प्रश्नाचं उत्तर देणार असेल तरी इतके सामने गमावल्यावरही त्यांच पुढील फेरीत पोहोचण्याचे चान्सेस किती आणि कसे? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
यात मुंबई संघाचा (MI) संघाचा विचार करता त्यांनी सलग सहा सामने गमावल्यामुळे ते शून्य गुण आणि -1.048 च्या रनरेटसह ते सर्वात शेवटच्या अर्थात दहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे सध्यातरी त्यांना स्पर्धेत राहण्यासाठी उर्वरीत आठ सामन्यांपैकी सात सामने जिंकणं अनिवार्य आहे. हे सर्व सामने चांगल्या रनरेटने जिंकणंही तितकच महत्त्वाचं आहे. पण यंदा आयपीएलमध्ये आठ जागी 10 संघ असल्याने मुंबईला पुढील फेरीत स्थानासाठी उर्वरीत आठ पैकी आठ सामने चांगल्या रनरेटने जिंकण अनिवार्य आहे. कारण पुढील फेरीत एन्ट्रीसाठी 16 गुण गरजेचे असल्याने मुंबई आठ पैकी आठ सामने जिंकल्यासत 16 गुण मिळवू शकते. दरम्यान मुंबईला पुढील फेरीत जाण्यासाठी इतर संघाचा खेळही तितकाच महत्त्वाचा असणार आहे.
चेन्नईकरांसमोरही मोठं आव्हान
स्पर्धेतील आणखी एक दमदार संघ म्हणजे चेन्नई सुपरकिंग्स. ज्यांनी 2010 साली सलग चार सामने गमावल्यानंतरही ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. यंदाही त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. सहा पैकी पाच सामना त्यांनी गमावले असून आता त्यांचा सातवा सामना असणार आहे. त्यांचा नेटरनेटरेटही -0.638 असून 16 गुण मिळवून एका चांगल्या रनरेटसहच ते पुढील फेरीत पोहचू शकतात. चेन्नईला देखील उर्वरीत आठ पैकी किमान सहा सामने जिंकून स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवता येईल. पण यंदा आठ जागी 10 संघ असल्याने पुढील फेरीत पोहोचण्यासाठी उर्वरीत आठ पैकी सात सामने तेही तगड्या रनरेटने जिंकणं चेन्नईला अनिवार्य असणार आहे.
मुंबई संघाचे उर्वरीत सामने
गुरुवार, 21 एप्रिल | डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई | चेन्नई सुपरकिंग्स | सायंकाळी 7.30 वाजता |
रविवार, 24 एप्रिल | वानखेडे स्टेडियम, मुंबई | लखनौ सुपरजायंट्स | सायंकाळी 7.30 वाजता |
शनिवार, 30 एप्रिल | डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई | राजस्थान रॉयल्स | सायंकाळी 7.30 वाजता |
शुक्रवार, 6 मे | ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई | गुजरात टायटन्स | सायंकाळी 7.30 वाजता |
सोमवार, 9 मे | डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई | कोलकाता नाईट रायडर्स | सायंकाळी 7.30 वाजता |
गुरुवार, 12 मे | वानखेडे स्टेडियम, मुंबई | चेन्नई सुपरकिंग्स | सायंकाळी 7.30 वाजता |
मंगळवार, 17 मे | वानखेडे स्टेडियम, मुंबई | सनरायजर्स हैदराबाद | सायंकाळी 7.30 वाजता |
शनिवार, 21 मे | वानखेडे स्टेडियम, मुंबई | दिल्ली कॅपिटल्स | सायंकाळी 7.30 वाजता |
हे देखील वाचा-
- IPL 15 : IPL झाली 15 वर्षांची, आजच्याच दिवशी झाला होता पहिला सामना, आयपीएलमधील आठवणींचा 'हा' खास VIDEO पाहाच
- Cancel IPL Trending: 'आयपीएल रद्द करा!', दिल्ली संघात कोरोनाच्या शिरकावानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मागणी
- Covid-19 Hits IPL 2022 : आयपीएलवर पुन्हा कोरोनाचं संकट, दिल्लीच्या खेळाडूला बाधा, आगामी सामन्यासाठी पुण्यालं जाणं रद्द